पुणे : काही एकपडदा चित्रपटगृह सुरू; काही अजूनही बंदच | पुढारी

पुणे : काही एकपडदा चित्रपटगृह सुरू; काही अजूनही बंदच

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सध्या हिंदी-मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर का होईना, पुण्यातील तीन ते चार एकपडदा चित्रपटगृहचालकांनी चित्रपटगृह सुरू केली आहेत. आताही त्यांना चित्रपटगृह चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसले, तरी त्यांनी ही जोखीम पत्करली आहे, तर दुसरीकडे काही चित्रपटगृहचालक अजूनही तळ्यात-मळ्यात असून, ते चित्रपटगृह सुरू करण्यास तयार नाहीत. त्यामुळे आताही काही एकपडदा चित्रपटगृह सुरू, तर काही बंदच आहेत. सरकारने एकपडदा चित्रपटगृहांच्या जागी दुसरा व्यवसाय करण्याच्या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा पुनरुच्चार पूना एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद मोहोळ यांनी केला आहे.

मुंबई : नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्‍याची तपासणी होणार !

राज्यातील सर्व मल्टिप्लेक्स 50 टक्के क्षमतेनुसार मागील वर्षी 22 ऑक्टोबरला उघडली; पण एकपडदा चित्रपटगृहे बंदच होती. कोरोनामुळे चालकांनी चित्रपटगृहे सुरू केली नाहीत; पण आता नवीन हिंदी-मराठी चित्रपट टप्प्याटप्प्याने प्रदर्शित होत असल्यामुळे पुण्यातील काही चालकांनी जोखीम पत्करून चित्रपटगृहे सुरू केली आहेत. काही चालक चित्रपटगृह सुरू करण्यास तयार नाहीत, असे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबई : नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्‍याची तपासणी होणार !

मोहोळ म्हणाले, ‘पुण्यात साधारणपणे 14 एकपडदा चित्रपटगृह आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही चित्रपटगृहे बंदच होती; पण आता हळूहळू चित्रपटगृह उघडण्यास चालकांनी सुरुवात केली आहे. त्याचे मूळ कारण म्हणजे सध्या चांगले हिंदी आणि मराठी चित्रपट प्रदर्शित होत असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच पुण्यातील तीन ते चार चित्रपटगृह सुरू झाली आहेत. दुसरीकडे आर्थिक तोटा सहन करायचा नसल्याने काही चालकांनी चित्रपटगृह अजूनही बंद ठेवली आहेत. त्यामुळे पुण्यात काही एकपडदा चित्रपटगृह सुरू, तर काही बंदच अशी स्थिती आहे.’ एकपडदा चित्रपटगृहांच्या जागी दुसरा व्यवसाय करण्याची आम्ही केलेली मागणी अजूनही कायम आहे. त्यासाठी आमचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. निर्णयाची वाट पाहत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

पुणे जिल्ह्यातील शेकडो एकर जमीन होणार सरकार जमा

बीएएमएस डॉक्टरांना भोंदू संबोधने महागात पडणार, आयुष मंत्रालयाचे परिपत्रक जारी

Gold Rate Today : सोन्याला झळाळी! ५० हजारांच्या पार, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर

Back to top button