कांदा मक्याच्या शेतात अफूची लागवड ; १२ लाखांचा माल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

कांदा मक्याच्या शेतात अफूची लागवड ; १२ लाखांचा माल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
Published on
Updated on

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील दुर्गम भागातील शिवारात कांदा आणि मक्याच्या शेतात अफुची लागवड करणाऱ्या दोघां शेतक-यांविरुध्द निजामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी १२ लाखांचा अफू जप्त केला.

तालुक्यातील निजामपूर पोलिस स्टेशन हद्दीत हट्टी गावच्या शिवारात मक्याच्या शेतात अफु अंमली पदार्थाची लागवड केल्याची गुप्त माहिती पीएसआय दीपक वारे यांना मिळाली. गोपनिय माहितीच्या आधारे पीएसआय वारे यांनी पीएसआय वसावे, पोना संदीप ठाकरे, सुधाकर शेंडगे, अवधुत होंडे, दीपक महाले, परमेश्वर चव्हाण, भुषण ठाकरे यांचे पथक रवाना केले. पथकासोबत स्वतःवारे होते. त्यांनी चिंतामन दगा पदमोर यांच्या शेतात छापा टाकला असता कांद्याच्या शेतात अफूची लागवड केलेली दिसून आली. तसेच पदमोर यांच्या शेतापासून जवळच असलेल्या सोमा पांडू सूर्यवंशी यांच्या शेतात मक्याच्या पीकात अफूची लागवड केल्याचे आढळून आले.

पोलिसांनी दोन्ही ठिकाणाहून ११ लाख ८५ हजार ४७५ रुपये किंमतीचा अफू जप्त केला असून चिंतामन पदमोर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सोमा पांडू सूर्यवंशी मात्र फरार आहे. एनडीपीएस कायदा कलम क १७ (क), १८ (क) व २० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, साक्रीचे डीवायएसपी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news