नंदुरबार : तलवार, एअरगनसह केबल चोरणारी टोळी जेरबंद, दरोडा टाकण्याचा होता इरादा

नंदुरबार : तलवार, एअरगनसह केबल चोरणारी टोळी जेरबंद, दरोडा टाकण्याचा होता इरादा
Published on
Updated on

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा : सुझलॉन टॉवरवर दरोडा टाकण्याच्या पुर्वतयारीत असलेल्या टोळीला नंदुरबार तालुका पोलीसांनी अटक केली असून एअरगन, तलवारीसारखे घातक शस्त्रही त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यातील सुझलॉन टॉवरवर होणा-या चोरीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन हद्दीत सुझलॉन कंपनीतर्फे २५० पवन चक्की बसविण्यात आलेल्या आहेत. या पवनचक्क्यांमधील केबल वायर चोरीच्या वारंवार घटना घडत आहेत. धुळे जिल्ह्यातील हट्टी खु// ता. साक्री गावातील टोळी सुझलॉन कंपनीच्या टॉवरसाठी नेमलेल्या सुरक्षा रक्षकांना धाक दाखवून त्यामधील केबल वायरची चोरी करणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

अधिक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४/०२/२०२२ रोजी पहाटे नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार वेगवेगळे पथक तयार करुन तपास करीत होते. काळमदेव मंदिराच्या पायथ्याशी दबा धरुन बसले असतांना एका मोटार सायकलवर चार इसम व दुसऱ्या मोटार सायकलवर एक असे पाच जण संशयित रित्या फिरत असल्याचे त्यांना आढळले. त्यांना लगेच पकडण्यात आले. त्यांच्याकडे एक एअर गन, एक लोखंडी तलवार आठ वेगवेगळ्या साईजचे लोखंडी पहाने, एक मोठे लोखंडी कटर त्याला धारदार पाते, दोन लहान कटर, हेक्झा ब्लेड/करवत पट्टी, एक किलो मिरची पावडर असे साहित्यही आढळून आले. संदिप गोरख सुर्यवंशी वय २५ वर्षे, मनोहर पोपट पदमोर वय २५ वर्षे, अधिकार रतन थोरात वय २७ वर्षे, राजेंद्र हिरामण खताळ वय ३८ वर्षे सर्व रा. हट्टी खु// ता. साक्री जि. धुळे अशी त्यांनी नावे सांगितली.

दरम्यान पाचवा आरोपी रोहिदास शिवाजी मासुळे रा. हट्टी खु// ता. साक्री जि. धुळे हा फरार झाला. त्यांच्याविरुध्द पो. कॉ. गणेश भबुतरा सोलंकी यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

ही कारवाई पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उप निरीक्षक सुरेश सोनवणे, असई/ संजय मनोरे, पोहेकॉ ज्ञानेश्वर सामुद्रे, पोना ज्ञानेश्वर पाटील, पोना आनंद मोरे, राजेंद्र धनगर, विनायक सोनवणे, गणेश सोलंकी, महेंद्र सोनवणे, दिपक मालचे, सचिन सैंदाणे यांनी केली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news