निपाणीत शनिवारी यल्लमा यात्रा | पुढारी

निपाणीत शनिवारी यल्लमा यात्रा

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : येथील यल्लमा देवीची बागेतील यात्रा शनिवारी 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार असल्याची माहिती अंबराई रेणुका मंदिर समितीचे अध्यक्ष विजयराजे देसाई-निपाणकर यांनी दिली.

सौंदत्ती येथील रेणुकादेवी घर आणि पालखी जग, मातंगी देवीचा जग, मंदिराचा जग गुरुवारी जाणार आहे. शुक्रवारी सौंदत्ती येथील रेणुका देवीची माघी पौर्णिमा यात्रा साजरी होणार आहे. तेथून निपाणीचे जग परत आल्यानंतर शनिवारी सालाबादप्रमाणे यल्लमा देवीची बागेतील यात्रा साजरी केली जाणार आहे.

यावेळी शहर व परिसरातील भाविकांनी आंबील व नैवेद्य आणण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. गेले आठ दिवस यल्लम्मा डोंगरावर मोठी गर्दी होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button