जळगाव : टेम्पो ट्रव्हलरची दुचाकीस धडक, वरखेडी येथील ३३ वर्षीय महिला ठार

जालना अपघातa
जालना अपघातa
Published on
Updated on

जळगाव पुढारी वृत्तसेवा : पाचोरा शहरातील रेल्वे उड्डाणपूलानजीक टेम्पो ट्रव्हलरने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील ३३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुल्ताना बी शकील काकर (वय – ३३) या पती सोबत दुचाकीने दि. १४ फेब्रुवारी रोजी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात जात होत्या.

वडीलांवर रूग्णालयात उपचार सुरू होते. वडीलांना पाहण्याासाठी जात असतांना शहरातील रेल्वे उड्डाणपूलानजीक त्यांच्या दुचाकीस टेम्पो ट्रॅव्हलर (क्रं. एम.एच. १९ – वाय – ६३८५) ने मागावुन जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागील बाजुस बसलेल्या सुल्ताना बी शकील काकर ह्या खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्या गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती चिंताजनक असल्याने सुल्ताना बी शकील काकर यांना पुढील उपचारासाठी जळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील टेम्पो ट्रॅव्हलर व चालक यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मयत सुल्ताना बी शकील काकर यांचे पाश्चात्य पती, एक मुलगी, दोन मुले असा परिवार असुन त्यांचे निधनाने वरखेडी सह परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news