BCCI Dream Project : बंगळुरात नव्या ‘एनसीए’ची पायाभरणी | पुढारी

BCCI Dream Project : बंगळुरात नव्या ‘एनसीए’ची पायाभरणी

बंगळूर ; वृत्तसंस्था : मोटेरा स्टेडियमनंतर ‘बीसीसीआय’चा ड्रीम प्रोजेक्ट (BCCI Dream Project) असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) नवीन कार्यस्थळाची सोमवारी पायाभरणी करण्यात आली. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांच्या हस्ते हा सोहळा संपन्‍न झाला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड म्हणून ओळखले आहे. देशातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद (मोटेरा) येथे आहे. आता ‘बीसीसीआय’ने भविष्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.

‘बीसीसीआय’ (BCCI Dream Project) बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला भव्य स्वरूप देणार आहे. सोमवारी अकादमीची पायाभरणी झाली. यावेळी अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि ‘एनसीए’चे संचालक व्ही.व्ही.एस. लक्ष्मण उपस्थित होते. यानंतर गांगुली आणि जय शहा यांनी याबाबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अकादमीमध्ये तीन मोठी मैदाने बांधण्यात येणार आहेत. एकामध्ये फ्लड लाईटचीही सोय आहे. म्हणजेच रात्रीही खेळाडूंना सराव करता येणार आहे. 40 हून अधिक सराव खेळपट्ट्यांसह जिमसह सर्व आधुनिक सुविधा येथे असतील. सध्या व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ‘एनसीए’प्रमुख आहेत. सर्व ज्युनिअर खेळाडू येथे तयारीसाठी येतात. याशिवाय वरिष्ठ खेळाडूही दुखापत झाल्यास रिहॅबसाठी येथे येतात.

 

Back to top button