नाशिक मनपा निवडणूक : प्रभाग 23 मध्ये शिवसेना-भाजपमध्ये काँटे की टक्कर

ShivSena BJP
ShivSena BJP
Published on
Updated on

नाशिकरोड : उमेश देशमुख : भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विशाल संगमनेरे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांना थेट खा. संजय राऊत यांनीच हिरवा कंदील दर्शविला आहे. शहर पदाधिकार्‍यांनी संगमनेरे यांच्या प्रवेशाबाबत अनुकूलता दर्शविली आहे. त्यांच्या प्रवेशावर त्याचप्रमाणे राजकीय आरक्षणावरच प्रभागातील राजकीय खेळी अवलंबून असल्याचे दिसते. शिवसेनेकडून इच्छुक असलेले माजी नगरसेवक अ‍ॅड. सुनील बोराडे, माजी नगरसेवक अशोक सातभाई, शिवा ताकाटे, सागर भोजने यांचे राजकीय गणित अवलंबून आहे. त्यामुळे संगमनेरे यांच्या प्रवेशाचा मुहूर्त कधी असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

प्रभाग 23 मध्ये शिवसेना, भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संतोष पिल्ले यांच्यावर अवलंबून राहावे लागेल. राष्ट्रवादीकडून योगेश निसाळ यांची मागील एक वर्षापासून तयारी सुरू आहे. महिलांमधून सुरेखा निमसे यांच्या नावाची चर्चा केली जाते. राष्ट्रीय काँग्रेसला येथे उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे.

शरद मोरे यांच्या नावाची चर्चा
एससी प्रवर्गातून भाजपचे शरद मोरे नगरसेवक आहेत. तर शिवसेनेला त्यांच्या तुलनेचा उमेदवार शोधावा लागेल. विशाल संगमनेरे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असून, त्यांच्यासोबत शरद मोरेदेखील शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा प्रभागात अनेक दिवसांपासून आहे.

सातभाई, बोराडे भाजपकडे?
शिवसेनेकडून विशाल संगमनेरे यांची उमेदवारी अंतिम मानली जाते. सर्वसाधारण महिला प्रवर्गातून शीतल ताकाटे किंवा सुनीता भोजने यांना शिवसेनेने उमेदवारी दिली तर अशोक सातभाई, अ‍ॅड. सुनील बोराडे हे भाजपकडून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

प्रमुख इच्छुक उमेदवार
शिवसेना : विशाल संगमनेरे, रंजना बोराडे, अ‍ॅड. सुनील बोराडे, अशोक सातभाई, शिवा ताकाटे, सागर भोजने, अजित बने, सारिका बने, मीरा फोलाणे.
भाजप : मीरा हांडगे, सचिन हांडगे, शरद मोरे, मंदा फड.
मनसे : संतोष पिल्ले, नीलेश पेखळे.
राष्ट्रवादी : योगेश निसाळ, सुरेखा निमसे.

असा आहे प्रभाग
जेलरोड पूर्वेकडचा भाग, पंचक गाव, पिंपळपट्टी रोड, प्रगतीनगर, पवारवाडी, कॅनॉल रोड, ढिकले मळा, ययातीनगर, एमईसीबी सबस्टेशन, एमईसीबी गोडाऊन परिसर, मराठानगर, मॉडेल कॉलनी, शिवशक्तीनगर, संत ज्ञानेश्वरनगर, गणेश व्यायामशाळा परिसर आदी.

प्रभागात महापालिका रस्त्यावर अतिक्रमण आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अतिक्रमणधारकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. प्रशासन कारवाई कधी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. – नितीन बोराडे

सरस्वतीनगरचा परिसर पंचक गावालगत आहे. राजकीय गटबाजीमुळे विकासकामे झालेली नाहीत, असा आमचा आरोप आहे. मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते.
– मंगेश भोसले

सायखेडा रोड परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होतो. सर्वसामान्यांनी नगरसेवकांना फोन केला, तर प्रतिसाद मिळत नाही. पाच वर्षे नगरसेवक फिरकलेच नाहीत. निवडणूक तोंडावर दिसायला लागली. – नरहरी कसबे

प्रगतीनगर, भैरवनाथनगर परिसरात डासांची समस्या प्रचंड प्रमाणात आहे. रात्रीचे जेवण करताना मच्छरदाणी लावावी लागते. गोदावरी नदीचे पाणी आणि त्यावर असलेल्या पाणवेली यामुळे नदीचे पात्र दृष्टीस पडत नाही. – केशव साळवे

हेही वाचा ;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news