नाशिक : खरेदीच्या बहाण्याने चार लाखांच्या दागिन्यांवर डल्ला ; सीसीटीव्हीत घटना कैद

नाशिक : खरेदीच्या बहाण्याने चार लाखांच्या दागिन्यांवर डल्ला ; सीसीटीव्हीत घटना कैद
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तिघा महिलांनी सराफ व्यावसायिकाचे लक्ष नसल्याची संधी साधत चार लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.९) घडली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सराफ बाजारातील भगीरथी ज्वेलर्सचे संजय दंडगव्हाळ यांच्या दुकानात बुधवारी (दि.९) दुपारच्या सुमारास तिन महिला दागिने खरेदीसाठी आल्या. यावेळी त्यांच्यासोबत अल्पवयीन मुलगीही होती. दुकानात गर्दी करून त्यांनी दुकानातील एका वयाेवृद्ध ग्राहकाला पुढे जाण्यास सांगितले. त्यानंतर अल्पवयीन मुलगी दुकानात आली व तिच्यासोबत असलेल्या एका महिलेने काऊंटरवर पर्स ठेवली. यावेळेतच दंडगव्हाळ यांना फाेन आल्याने ते माेबाईलवर बाेलत हाेते. ही संधी साधून महिलेने दंडगव्हाळ यांची नजर चुकवून त्यांच्या हातासमाेरील काऊंटरमधून ८७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ठेवलेली डबी लंपास केली. या महिला व मुलगी दुकानातून बाहेर गेल्या व रिक्षात बसून पंचवटीच्या दिशेने गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

व्हिडिओ पहा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news