जळगाव : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्ष कैद

molestation
molestation
Published on
Updated on

जळगाव; पुढारी वृत्‍तसेवा : तालुक्यातील शिरसोली येथील एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना २०१४ मध्ये घडली होती. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला तीन वर्ष कैद आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्याचा साधा कारावास व सदर रक्कमेतून चार हजार रुपये पीडितेला देणे असाही आदेश न्यायालयाने दिला आहे.

तालुक्यातील शिरसोली येथे २३ सप्टेंबर २०१४ रोजी दुपारच्या वेळेस ग्रामपंचायतींच्या शौचालयाजवळ आरोपी विश्वास भिल्ल याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. पीडितेने आरोपीविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली व आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. ( जळगाव )

जिल्हा व सत्र न्या.एस.जी.ठुसे यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी वकील वैशाली महाजन यांनी एकूण ८ साक्षीदार तपासले. त्या साक्षीदारांपैकी पीडित मुलीचा जवाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक अशोक अहिरे व इतर साक्षीदार यांचा जबाब महत्वपूर्ण ठरला. संपूर्ण साक्षीपुराव्याअंती जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी आरोपीस लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचा कायदा कलम ८ प्रमाणे दोषी धरुन तीन वर्ष कैदेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ( जळगाव )

तसेच सदर दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्याचा साधा कारावास व सदर रक्कमेतून चार हजार रुपये पीडितेला देण्याबाबत आदेश दिला आहे. याकामी सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी वकील वैशाली महाजन यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी यांनी मदत केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news