पुणे : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जबरी चोरीच्या चार घटना | पुढारी

पुणे : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जबरी चोरीच्या चार घटना

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरात बंडगार्डन, समर्थ, वानवडी तसेच कोंढवा परिसरात चार जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. आता चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या मेडीकल दुकानांना लक्ष करण्यास सुरूवात केली असून अशा दोन घटना बुधवारी पहाटे घडल्या. त्या व्यतिरिक्त दुचाकी चोरीच्या पाच आणि इतर चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत.

अमरावती : आयुक्तांना जीवे मारण्याचा प्रयत्न; आमदार रवी राणांसह १० जणांवर गुन्हा दाखल

अर्जुन शिवाप्पा चरूगडे (46, भिमनगर, धानोरी) हे पुणे रेल्वे स्टेशन समोरी पीएमटी डेपो समोरून 4 फेब्रुवारी रोजी पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांचा महागडा मोबाईल चोरून नेला. दुसर्‍या घटनत कुमार पंडीत हुसगे (21, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) हे केईएम हॉस्पीटल कडून नरपतगिरी चौकाकडे जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांचा मोबाईल चोरून नेला हा प्रकार 31 डिसेंबर रोजी पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारस धडला होता. समर्थ पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्‍या मुलाला युपीत मतदान सुरु असतानाच जामीन

तिसर्‍या घटनेत वानवडी परसरातील वेलनेस फॉर एव्हर मेडिक या नेन्सी टावर मधील दुकानात राजेश प्रकाश आलकोंडा (39, रा. गंजपेठ, महात्मा फुले वाड्याजवळ) हे काम करत असताना दुचाकीवर आलेले दोघे जण दुकानात शिरले. त्यांनी त्यांच्याकडील पिस्तुल सारखे शस्त्र फिर्यादी यांच्यावरून रोखून जबरदस्तीने ड्राव्हरमधील पाच हजार रूने चोरून नेले. याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.9) पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडला. असाच प्रकार उंड्री चौकातील श्री स्वामी समर्थ मेडिकल शॉपमध्ये घडला. उमेश चंद्रकांत यादव (रा. नाईन ग्रीन अपार्टमेंट , हांडेवाडी रोड) हे दुकानात असताना दुचाकीर आलेल्या चोरट्यांना त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याजवळील गल्ल्यातील साडेपाच हजारांची रोकड चोरून नेली. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button