वन्यजीवांचे दुर्मीळ अवयव हस्तगत ; कोल्हापूर वनविभागाची नाशिकमध्ये कारवाई

वन्यजीव तस्करीतील संशयितांकडून हस्तगत केलेल्या मुद्देमालासमवेत कोल्हापूर वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी.
वन्यजीव तस्करीतील संशयितांकडून हस्तगत केलेल्या मुद्देमालासमवेत कोल्हापूर वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : गोदाकाठावरील पूजा साहित्य विक्री दुकानांमध्ये खुलेआम मृत सागरी जीवांसह अन्य वन्यजीवांची अंधश्रद्धेपोटी विक्री होत असल्याची धक्कादायक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. कोल्हापूर वनविभागाने पंचवटी परिसरात छापेमारी करत इंद्राजाल (ब्लॅक कोरल) व हत्ता जोडी (घोरपडीचे गुप्तांग), साळींदरचे काटे, रानडुक्कर दात यांच्यासह अन्य वन्यजीव अवयव हस्तगत केले आहेत. तसेच संशयित विक्रेता कैलास बबन कुलथे याला अटक केली.

पश्चिम महाराष्ट्रात ऑक्टोबर 2021 मध्ये वनविभागाने विविध पूजा साहित्य भांडारवर केलेल्या कारवाईमध्ये इंद्रजाल, रेड सी फॅन, हत्ताजोडी आदी शेड्युलमधील वन्यजीव प्रतिबंधित साहित्य आढळून आले होते. चौकशीत नाशिक कनेक्शन पुढे आले होते. त्यानुसार कोल्हापूर वनविभागाने पंचवटी सार्वजनिक वाचनालयाजवळील लक्ष्मी पूजा साहित्य भांडारवर छापेमारी करत सागरी व इतर वन्यजीवांचे अवयव जप्त केले. संशयित कुलथेला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

नाशिकचे मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक महादेव मोहिते (सातारा), विभागीय वनाधिकारी विशाल माळी (कोल्हापूर), मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे (सातारा), सहायक वनसंरक्षक अजित साजणे (सांगली), सहायक वनसंरक्षक गणेश झोळे (नाशिक), वनक्षेत्रपाल युवराज पाटील (सांगली), वनक्षेत्रपाल महेंद्र पाटील (नाशिक), वनरक्षक सागर थोरवत, योगेश खैरनार, ज्ञानेश्वर शिंदे, सुरेख कुवर, मेळघाट सायबर सेलचे जीवन दहीकर यांनी कारवाईत सहभाग नोंदविला. दरम्यान, परजिल्ह्यातील पथकाने नाशिक शहरात येत कारवाईने स्थानिक वनविभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news