काँग्रेसचा आरोप : ‘भाजपच्या नोकरी विक्री’ची चौकशी करू | पुढारी

काँग्रेसचा आरोप : ‘भाजपच्या नोकरी विक्री’ची चौकशी करू

पणजी : पुढारी वृत्तसेवा

भाजपचे नेते खाणी सुरू करणार, असे आश्वासन देऊन खाणकाम बंदीमुळे भरडल्या जाणार्‍या जनतेची फसवणूक करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जुमला राजकारणी आहेत. ते निवडणुकीच्या तोंडावर अशी जुमलेबाजी करण्यात तरबेज आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

चोडणकर म्हणाले, केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने अशी अनेक वेळा आश्वासने दिली. पण ती सत्यात आणली नाहीत. ‘आजपर्यंत त्यांना खनिज व्यवसाय सुरू करण्यास यश मिळालेले नाही. मग गोव्यातील लोकांनी आताच यांच्यावर का विश्वास ठेवावा?
‘अमित शहा हे त्यांच्या जुमला राजकारणासाठी ओळखले जातात. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी परदेशातून काळा पैसा परत आणून सर्व नागरिकांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. असे घडले का? लोकांना पैसे मिळाले का? नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की हा निवडणुकीतील राजकीय जुमला होता. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची लोक गांभीर्याने दखल घेत नाहीत. मला खात्री आहे की गोमंतकीय त्यांना गांभीर्याने घेणार नाहीत, असे चोडणकर यांनी सांगितले. 2012 पासून, भाजप पंचायत व पालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत खाणकाम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन देत आहे. पण खाणकाम पुन्हा सुरू करण्यात त्यांना अपयश आले. काँग्रेस या हेराफेरीच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करेल. आयोगाकडून आम्हाला अहवाल मिळाल्यानंतर, भरती रद्द केली जाईल आणि नवीन प्रक्रिया सुरू होईल, जेणेकरून पात्र उमेदवारांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या अलका लांबा, अ‍ॅड. श्रीनिवास खलप, महिला अध्यक्षा बिना नाईक आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर यावेळी उपस्थित होते

पत्रकार परिषदेत बोलताना अलका लांबा, बाजूला गिरीश चोडणकर, अ‍ॅड. श्रीनिवास खलप, बिना नाईक, अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर.
पत्रकार परिषदेत बोलताना अलका लांबा, बाजूला गिरीश चोडणकर, अ‍ॅड. श्रीनिवास खलप, बिना नाईक, अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर.

राहुल गांधी 4 रोजी गोव्यात

पणजी : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा बुधवारचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या अलका लांबा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. अलका लांबा म्हणाले की, राहुल गांधी केंद्रीय अर्थसंकल्पावर संसदेत आपली प्रतिक्रिया देणार आहेत. तसेच 3 फेब्रुवारी रोजी रायपूर येथे शहिदांच्या सन्मानार्थ स्मारकाच्या भूमिपूजनासाठी ते जात असल्याने गोवा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. लांबा यांनी मंगळवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन गोव्यात राहुल गांधींचा कार्यक्रम 2 फेब्रुवारीऐवजी 4 फेब्रुवारीला होणार असल्याचे सांगितले. गोवा दौर्‍यात ते पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी, अंगणवाडी कर्मचारी आणि इतरांशी संवाद साधतील. याशिवाय ते कार्यकर्त्यांच्या सभांना संबोधित करतील आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मार्गदर्शनही करतील.

हेही पाहा : महिलांसाठी कसं असेल बजेट 2022 : उद्योजिका सुनीता रामनाथकर यांची प्रतिक्रिया

Back to top button