नाशिक : कुरियर कंपनी कार्यालयाचे शटर उचकावून चोरी ; लाखोंची रोकड लंपास | पुढारी

नाशिक : कुरियर कंपनी कार्यालयाचे शटर उचकावून चोरी ; लाखोंची रोकड लंपास

नाशिक : शहरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी घरफोड्या करत अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबरार मुजफ्फर खान (33, रा. वडाळा गाव रोड) यांच्या तपोवन परिसरातील कुरियर कंपनी कार्यालयाचे शटर उचकावून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. लॉकरमधील एक लाख 38 हजारांची रोकड, सीसीटीव्ही व डीव्हीआर असा एक लाख 56 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.

शशिकला दामोदर गायकवाड (62, रा. सिडको) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील सोन्याची माळ, पोत, कानातील रिंग, चांदीची कुयरी व 70 हजारांची रोकड असा एक लाख 47 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button