नाशिक मनपा : आता कोरोना संसर्गाचे प्रमाणपत्र पाहूनच मिळणार रजा ; आयुक्त कैलास जाधव यांचा निर्णय | पुढारी

नाशिक मनपा : आता कोरोना संसर्गाचे प्रमाणपत्र पाहूनच मिळणार रजा ; आयुक्त कैलास जाधव यांचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेत ( नाशिक मनपा) कोरोना संसर्ग झाल्याच्या नावाखाली काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून दांड्या मारण्याचे प्रकार वाढल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होत आहे. त्यामुळेच यापुढे आता कोरोना संसर्ग झाल्याचे प्रमाणपत्र पाहूनच कर्मचार्‍यांना रजा मंजूर करण्याचा निर्णय आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला असून, तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

महापालिकेच्या ( नाशिक मनपा) आस्थापनावरील मनुष्यबळ सात हजार इतके दिसत असले, तरी आजमितीस जवळपास अडीच हजार जागा रिक्त आहेत. त्यामुळे साहजिकच सध्या कामावर असलेल्या कर्मचारी तसेच अधिकार्‍यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यातही महापालिकेत अनेक कर्मचारी व अधिकारी असे आहेत की, ते केवळ नावाला हजेरी लावतात आणि बाहेर पडतात. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणार्‍यांनाच कामाचा ताण सहन करावा लागत आहे.

त्यातही आता काम चुकवेगिरी करणार्‍यांना कोरोना संसर्गाचा नवा फंडा सापडला असून, कोरोनाच्या नावाखाली तसेच सर्दी, पडसे, खोकला या आजाराच्या नावाखाली एक-एक आठवडा दांडी मारण्याचे प्रमाण वाढले आहे. कामाच्या वाढत्या ताणामुळेदेखील रजा घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यातही सर्दी, खोकला, ताप या आजाराच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्याचा फायदा उठवत अनेक कर्मचार्‍यांकडून निरोप देत सुटी मारली जात असल्याचे आढळून आले आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button