जळगाव पाचोर्‍यातील अल्पवयीन बनली कुमारी माता | पुढारी

जळगाव पाचोर्‍यातील अल्पवयीन बनली कुमारी माता

जळगाव: पुढारी वृत्तसेवा
पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलगी अत्याचारातून कुमारी माता झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • सिन्नर येथे कुरापत काढून 11 जणांकडून शेतकर्‍यास तलवारीने मारहाण
    अल्पवयीन मुली (16) चे आईवडील ऊसतोडणी कामगार (जि. सातारा) आहेत. पालक कामावर गेले असता, अज्ञात इसमाने तिच्यावर अत्याचार केल्याने ती मुलगी कुमारी माता झाली आहे. यासंदर्भात मल्हार पेठ, जि. सातारा येथील पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दीपक शांताराम सोनवणे, कल्पना शांताराम सोनवणे, शांताराम भगवान सोनवणे, शालिक सोनवणे, सिंधू भरत भिल, भरत भिल या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button