जळगाव येथे एका तरूणाचा संशयास्पद मृत्यू ; रस्त्यावर आढळला मृतदेह | पुढारी

जळगाव येथे एका तरूणाचा संशयास्पद मृत्यू ; रस्त्यावर आढळला मृतदेह

जळगाव : प्रतिनिधी : शहरातील ममुराबाद रोडवर एका तरूणाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरूणाच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती.

येथील उस्मानियॉ पार्क येथे राहत असलेला शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५) हा तरुण बांधकाम क्षेत्रात काम करुन आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्च्यात कुटुंबामध्ये आई-वडील, पत्नी, भाऊ व दोन मुले असा परिवार आहे. बुधवारी २६ जानेवारी रोजी सायंकाळी काम आटोपून तो घरी निघाला होता. परंतू तो रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो कोठेही आढळून आला नाही. गुरूवारी २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ममुराबाद रोडवरील कोंबडी फार्मजवळ त्यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला.

त्यांच्या डोक्यावर, हनुवटीवर मार लागल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. जळगाव तालुका पोलीस आणि नातेवाईकांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला. यावेळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईक व मित्र परिवार यांनी मोठी गर्दी केली होती. तरूणाचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशयित नातेवाईकांकडून केले जात आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी पुढील चौकशी करत आहे.

हेही वाचा :

Back to top button