नाशिक : एमपीएससीच्या पहिल्या पेपरला एवढ्या विद्यार्थ्यांनी मारली दांडी | पुढारी

नाशिक : एमपीएससीच्या पहिल्या पेपरला एवढ्या विद्यार्थ्यांनी मारली दांडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीमार्फत रविवारी (दि. 23) नाशिक जिल्ह्यातील 47 केंद्रांमध्ये राज्यसेवेची पूर्वपरीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षा केंद्रचालकांनी प्रवेश देण्यापूर्वी ओळख पुराव्याच्या सत्य प्रतीची मागणी केल्याने उमेदवारांची ऐनवेळी भंबेरी उडाली, तर केंद्रात पोहोचण्यास विलंब झाल्याने अनेक उमेदवारांना परीक्षेला मुकावे लागल्याचे चित्र होते.

राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यात 17 हजार 916 परीक्षार्थी होते. सकाळी 10 ते 12 व दुपारी तीन ते पाच या दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांना परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी बोलाविण्यात आले होते. पहिला पेपर 11 हजार 493 उमेदवारांनी हजेरी लावली, तर 6 हजार 423 उमेदवार गैरहजर होते. दुसर्‍या पेपरला 11 हजार 403 उमेदवार उपस्थित होते, तर 6 हजार 513 उमेदवार अनुपस्थित होते. दरम्यान, कोरोना नियमांचे पालन करून 47 केंद्रांमध्ये परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. केंद्रात प्रवेश देताना पेन, प्रवेशपत्र, ओळखपत्र हे बाळगण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच परीक्षार्थींची तापमान मोजणी करूनच प्रवेश दिला जात होता. परीक्षार्थींना मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक होते.

हेही वाचा :

Back to top button