लखमापूरच्या कंपनीत झालेल्या स्फोटात एक ठार, चार गंभीर जखमी | पुढारी

लखमापूरच्या कंपनीत झालेल्या स्फोटात एक ठार, चार गंभीर जखमी

वणी : पुढारी वृत्तसेवा
लखमापूर (ता. दिंडोरी) शिवारातील नामांकित मेगाफाइन कंपनीत स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत एक ठार, तर चार जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील औद्योगिक क्षेत्रातील मेगाफाइन कंपनीमध्ये शुक्रवारी (दि. 21) एका विभागात रिअ‍ॅक्टर मशीनला अचानक आग लागून स्फोट झाला. या स्फोटात तेथील कामगार संदीप गायकवाड (रा. मडकीजांब, ता. दिंडोरी) यांचा मृत्यू झाला, तर कमलेश रमेश गवळी (रा. मडकीजांब) हे गंभीर जखमी झाले, तर केशव सुनीराम धुळे (रा. ननाशी, ता. दिंडोरी), बाजीराव निवृत्ती चव्हाण (रा. अंजनेरी, ता. र्त्यंबकेश्वर), रवींद्र गोपाळा गोर्‍हाळे (रा. दोनवडे) हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कंपनीचे अधिकारी प्रमोद बाळकृष्ण बच्छाव यांनी या घटनेची माहिती वणी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी अकस्मात जळीत प्रकरण म्हणून नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रतन पगार, पी. आर. शेलार अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button