नाशिक : हेल्मेट कारवाईचा मुहूर्त उद्यापासून ; विनाहेल्मेट चालकांचे पोलिसांकडून समुपदेशन | पुढारी

नाशिक : हेल्मेट कारवाईचा मुहूर्त उद्यापासून ; विनाहेल्मेट चालकांचे पोलिसांकडून समुपदेशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेटचा वापर वाढावा, यासाठी शहर पोलिसांनी (नाशिक) दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. यासाठी मंगळवार (दि. 18) पासून कारवाईस सुरुवात होणार होती. मात्र, पोलिसांनी या निर्णयात फेरबदल करीत कारवाईचा मुहूर्त मंगळवारऐवजी गुरुवार (दि. 20) ठरविला आहे. त्यानुसार गुरुवारपासून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना दोन तास समुपदेशन, परीक्षा व दंडाचा सामना करावा लागणार आहे.

शहरात अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत असून, त्यात सर्वाधिक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. यातही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे प्रमाण 111 इतके आहे. त्यामुळे अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी शहर पोलिसांनी वेगवेगळे उपक्रम, मोहीम, आदेश राबवून हेल्मेट वापराचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता हेल्मेट नसलेल्या चालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. पहिल्यांदा विनाहेल्मेट पकडल्यास 500 रुपये व त्यानंतर पुन्हा पकडल्यास हजार रुपयांचा दंड व वाहन परवाना निलंबित करण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारपासून कारवाई करण्यात येणार होती. मात्र कारवाई पुढे ढकलण्यात आली असून आता गुरुवारपासून कारवाईला मुहूर्त लागणार आहे.

हेही वाचा :

Back to top button