सिडकोत नियमांचे उल्लंघन 17 लाखांचा दंड; घनकचरा विभागाची 1907 जणांवर कारवाई | पुढारी

सिडकोत नियमांचे उल्लंघन 17 लाखांचा दंड; घनकचरा विभागाची 1907 जणांवर कारवाई

सिडको : पुढारी वृत्तसेवा
कोरोना प्रादुर्भाव आणि शहर स्वच्छतानिमित्ताने नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येते. मनपाच्या आरोग्य विभागाने सिडकोत कारवाई मोहीम कठोर केली. विविध शासकीय नियमांची पायमल्ली करणार्‍या तब्बल 1907 व्यावसायिक व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत, गेल्या 10 महिन्यांत सिडको विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने 17 लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती मनपा सिडको आरोग्य विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांनी दिली.

या विभागाने दहा महिन्यांत सर्वात मोठी दंडात्मक कारवाई केल्याने मनपाच्या तिजोरीत आर्थिक भर पडली आहे. कोरोना प्रादुर्भाव आणि शहर स्वच्छतानिमित्ताने महापालिकेकडून काही नियम करण्यात आलेत. बहुतांश नागरिकांकडून या नियमांचे उल्लंघन करण्यात येते. त्यामुळे स्वतःसह इतरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो. काही व्यावसायिक व नागरिकांकडून नियमांची सर्रास पायमल्ली होते. यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विभागीय अधिकारी मयूर पाटील, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 1907 व्यावसायिक व नागरिकांवर कारवाई करीत, 1 एप्रिल 2021 ते 16 जानेवारी 2022 या 10 महिन्यांत 17 लाख 14 हजार 240 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

आकडेवारी व दंड

कचर्‍याबाबत : 10 केसेस :
28,200 रुपये
नदी-नाले सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करण्याबाबत : 5 केसेस : 5,800 रुपये
रस्ते मार्गावर घाण कचरा करणे : 251 केसेस : 1,81,240 रुपये
मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकणे : 153 केसेस : 2,04,800 रुपये
मास्क न वापरण्याबाबत : 1,210 केसेस : 6,05,000 रुपये
प्रतिबंधित प्लॅस्टिक वापराबाबत : 25 केसेस : 1,30,000 रुपये
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे : 64 केसेस : 64,000 रुपये
उघड्यावर लघुशंका करणे : 19 केसेस : 3,800 रुपये
बायोमेडिकल वेस्टेज : 3 केसेस : 60,000 रुपये
नियमबाह्य अस्थापना सुरू ठेवण्याबाबत : 28 केसेस : 1,40,000 रुपये
सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे : 29 केसेस : 2,70,000 रुपये
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे : 105 केसेस : 21,000 रुपये
एकूण – 1907 जणांवर कारवाई : 17 लाख, 13 हजार 840 रुपयांचा दंड

हेही वाचा :

Back to top button