

Opposition Morcha on Election Commission:
मुंबई : निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झाले आहे. सुमारे एक कोटी बोगस मतदार आहे. हे घुसखोर आहे..यांना बाहेर काढणे गरज आहे. 1 नोव्हेंबर निवडणूक आयोगाच्या कारभारावर मुंबईत एक विराट मोर्चा काढण्यात येईल.मतदारांची ताकद आम्ही पंतप्रधान यांना दाखवली जाईल. या मोर्चाचे नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करतील, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. १९) सर्वपक्षीय विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील, मनसे नेते बाळा नांदगावकर, माकपचे प्रकाश रेड्डी आणि काँग्रेसचे सचिन सावंत उपस्थित होते.
यावेळी राऊत म्हणाले की, आज उद्धव ठाकरे यांच्यावतीने आम्ही आज पत्रकार परिषद घेत आहोत. मनसेचे पदाधिकारीही येथे आले आहेत हे आनंदाची गोष्ट आहे. मतदार यादी घोटाळ्या बाबत निवडणूक आयोगा विरोधात आम्ही लढाई लढत आहे. निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झाले आहेत. आमदार विलास भुरे असे म्हणाले मी 20 हजार मतदार बाहेरून आणले.मी दुबार लोकांचे नाव दिली पण काढले नाही, हे मंदा म्हात्रे यांचे महत्वाचे वाक्य आहे. संजय गायकवाड यांनी सांगितले आहे बुलढाण्यात 1 लाख पेक्षा जास्त बोगस मतदार आहे. आता यांना दणका द्यावा लागेल. रस्त्यावर द्यावे लागेल. यासाठी आता 1 नोव्हेंबर निवडणूक आयोगाच्या कारभारावर मुंबईत एक विराट मोर्चा काढण्यात येईल.मतदारांची ताकद आम्ही पंतप्रधान यांना दाखवली जाईल. या मोर्चाचे नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करतील.
मतदार यादी घोळाबाबत आमची निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांबरोबर चर्चा झाल्या. अनेक उदाहरण आहे आम्ही समोर दिली नाही. निवडणूक आयोगाने उत्तर देणे अपेक्षा होती. मात्र त्यांचे उत्तर समाधान कारक नाही आहे. त्यामुळेच आता सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा निर्णय झाला आहे. मतदार यादीत चुकीच्या वाटेने लोक घुसवले आहेत. लोकशाहीला धक्का पोहोचवण्याचे काम ज्यांच्याकडून होत असून त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे.पारदर्शकता हेच लोकशीचे मर्म आहे.बऱ्याच गोष्टी निवडून आयोग लपवत आहे. आता १ नोव्हेंबर रोजी आयोजित मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मतदान चोरीबाबत राहुल गांधी यांनी यापूर्वीही सांगितलेले आहे. आता महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांच्या नेत्यांची मागणी मान्य केलेली नाही. निवडणूक आयोगाने हात झटकले आहेत. जी यादी केली आहे त्यात घोळ आहे. आम्हाला ती यादी प्राप्त झाली नाही. आदर्श प्रक्रिया राबवली जात नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले.
मतदार यादीतील घोटाळा मोठा आहे. सामान्य लोकांना विश्वास निर्माण होण्यासाठी निवडणूक आयोगाची विश्वासार्त राहिली पाहिजे. आता आम्ही १ नोव्हेंबरला मोर्चा काढून पुन्हा एकदा आमच्या मागण्या मांडणार आहोत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
मतदार यादी पारदर्शिक असणे अपेक्षित आहे. यामध्ये सुधारणा केली पाहिजेत. याबाबत आम्ही दोनवेळा निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांची भेटही घेतली. जो खुलासा करण्यात आला तो खोटा आहे. आम्ही सांगितले त्यात सुधारणा झाली पाहिजे.मतदार यादीचा मुद्दा प्राथमिक आहे.. आम्ही आमची तीव्र भावना दाखवण्यासाठी हा मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती माकपचे प्रकाश रेड्डी यांनी दिली.