नवी मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भाजप आमदार मंदा म्हात्रे : भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नाही, अशा थेट शब्दात भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी घरचा आहेर दिला आहे.
स्वपक्षीय नेत्यांकडूनच डावलले जाते अशी खंत भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांनी महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या समोर त्यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.
मंदा म्हात्रे या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, मला दोन वेळा निवडून आल्यानंतरही संघर्ष करावा लागत आहे. महिलांना राजकारणात संघर्ष करावा लागतो. महिलांनी चांगलं काम केल्यानंतर पुरुष नेत्यांकडून पंख छाटायला सुरु होतात.
मला कोणाला घाबरायची गरज नाही. मी नेहमी स्पष्टच बोलते. मला तिकीट दिलं किंवा नाही, तरी मी लढणार म्हणजे लढणार. इतर पक्ष साथ द्यायला अशा शब्दात त्यांनी संकल्प व्यक्त केला.
त्या पुढे म्हणाल्या की, मी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मोदी लाट असल्याचे म्हटले गेले, पण मी दुसऱ्यांदा सुद्धा निवडून आले, त्यावेळी मोदी लाट नव्हती ना? ते माझं काम होते, कर्तृत्त्व होते.
महिलांनी केलेलं काम झाकून ठेवून त्यांच्या बातम्या येऊ देत नसल्याचे प्रकार होतात, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
हे ही वाचलं का?