Who is Seema Pahuja: दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; CBIच्या तपासाची सूत्रं नव्या अधिकाऱ्याकडे, कोण आहेत 'गोल्ड मेडलिस्ट' सीमा पाहूजा?

Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBIने नव्याने FIR दाखल केल्यानंतर तपासाला वेग आला आहे.
Who is Seema Pahuja Disha Salian Case
Who is Seema Pahuja Disha Salian CasePudhari
Published on
Updated on

Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा वेगळं वळण घेतलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात नव्याने FIR दाखल केली असून आता तपासाची सूत्रे अनुभवी अधिकारी सीमा पाहूजा यांच्या हाती सोपवण्यात आली आहेत. संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाहुजा यांच्या नियुक्तीमुळे या प्रकरणातील तपासाकडे विशेष लक्ष लागलं आहे.

दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी, 14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे दिशा सालियन प्रकरणाची चर्चा देशभर झाली होती. मात्र, दिशा यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत राहिले आणि त्यांच्या कुटुंबीयांकडूनही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाने 2 सप्टेंबर 2026 रोजी या प्रकरणाच्या तपासाचे निर्देश CBIला दिले. न्यायालयाने आधीच्या तपासातील काही विसंगतींची दखल घेत सर्व पैलूंची चौकशी करण्यास सांगितले. त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीला पुरेसा ठोस पुरावा मिळेपर्यंत आरोपी म्हणून संबोधू नये, असेही स्पष्ट करण्यात आले.

यानंतर CBIने दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवला आणि 13 सप्टेंबरला FIR दाखल केला. या FIRमध्ये विविध व्यक्तींची चौकशी करण्याचा उल्लेख असल्याचे वृत्त आहे. मात्र, तपासाच्या या टप्प्यावर कोणालाही आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. पुढील कारवाई पुराव्यांच्या आधारेच केली जाणार आहे.

कोण आहेत 'गोल्ड मेडलिस्ट' सीमा पाहूजा?

आता या हाय-प्रोफाइल प्रकरणाचा तपास CBIच्या विशेष गुन्हे विभागातील पोलीस अधीक्षक सीमा पाहूजा यांच्या देखरेखीखाली होणार आहे. पाहूजा यांनी यापूर्वी देशातील अनेक संवेदनशील आणि चर्चेत राहिलेल्या प्रकरणांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हाथरस प्रकरण, उन्नाव प्रकरण आणि 2024 मधील कोलकाता आरजी कर रुग्णालयातील बलात्कार-हत्या प्रकरणाच्या तपासाशी त्यांचं नाव जोडलेलं आहे. तपासातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना 2021 मध्ये ‘बेस्ट इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर’ पुरस्काराने सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आलं होतं. सध्या त्या CBI मुख्यालयातील स्पेशल क्राईम युनिटमध्ये SP म्हणून कार्यरत असल्याचे वृत्त आहे.

Who is Seema Pahuja Disha Salian Case
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी; चांदी तब्बल ३ हजारांनी महागली, तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

आता तपासाची दिशा काय असणार?

CBIकडून सर्वप्रथम आधी झालेल्या तपासाची कागदपत्रे, पोलिस रेकॉर्ड, पंचनामा, पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक अहवाल यांची छाननी केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर घटनास्थळाची पुन्हा पाहणी आणि यापूर्वी जबाब नोंदवलेल्या व्यक्तींची नव्याने चौकशी केली जाऊ शकते.

दिशाच्या मृत्यूपूर्वी तिचा होणारा पती रोहन रॉय यांच्या घरी झालेल्या पार्टीत कोण कोण उपस्थित होते, त्या रात्री नेमक्या कोणत्या घटना घडल्या, याचाही तपास केला जाणार आहे. त्या रात्री उपस्थित असलेल्या व्यक्तींचे जबाब पुन्हा नोंदवले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय कॉल डिटेल रेकॉर्ड, डिजिटल उपकरणांमधील माहिती आणि उपलब्ध फॉरेन्सिक पुरावे यांचीही तपासणी केली जाऊ शकते.

जुन्या तपासातील कागदपत्रेही पुन्हा तपासली जाणार?

या प्रकरणात आधीच्या तपासादरम्यान तयार झालेली कागदपत्रे आणि पुरावेही CBIच्या तपासाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. काही कागदपत्रे किंवा पुराव्यांमध्ये फेरफार झाला होता का, तपासाच्या प्रक्रियेत कोणती माहिती दुर्लक्षित राहिली का, याचीही पडताळणी होऊ शकते.

मृत्यूची नेमकी परिस्थिती, घटनाक्रम आणि उपलब्ध पुरावे यांची सांगड घालत CBI पुढील तपासाची दिशा निश्चित करणार आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत कोणते पुरावे किंवा नवे तपशील समोर येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Who is Seema Pahuja Disha Salian Case
E-Commerce Discount Rules: 'ऑफर'चा खेळ संपणार? नव्या नियमामुळे बड्या ब्रँड्सची कोंडी; काय बदल होणार?

सहा वर्षांनंतर पुन्हा तपासाची नवी सुरुवात

दिशा सालियनच्या मृत्यूला सहा वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. या काळात या प्रकरणाभोवती अनेक दावे, आरोप आणि राजकीय वाद निर्माण झाले. मात्र, आता CBIच्या नव्या तपासामुळे या सर्व दाव्यांची पडताळणी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयानेही तपासात कोणत्याही निष्पाप व्यक्तीला त्रास होऊ नये आणि पुरावे मिळाल्यासच संबंधितांविरोधात पुढील कारवाई व्हावी, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता सीमा पाहूजा यांच्याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news