Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Yogi Adityanath : मुंबई दौऱ्यावर आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (दि. ५) सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे राज्यपालांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आदित्यनाथ यांनी भूमिगत संग्रहालयाबाहेर समुद्रकिनारी असलेल्या श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले.

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर राज्यपालांच्या विनंतीवरून त्यांनी राजभवनातील ब्रिटिश कालीन भुयारात निर्माण करण्यात आलेल्या 'क्रांतिगाथा' या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली.

Yogi Adityanath : यावेळी त्यांनी संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन शिवरायांना अभिवादन केले. उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी संग्रहालयातील सर्व क्रांतिकारकांची माहिती जाणून घेतली. भूमिगत संग्रहालयाबाहेर समुद्रकिनारी असलेल्या श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले व देवीची आरती केली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news