Mumbai Sakinaka News : साकीनाका येथे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या ‘कट्टरपंथीया’च्या घरावर हातोडा

Mumbai Sakinaka News : साकीनाका येथे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या ‘कट्टरपंथीया’च्या घरावर हातोडा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : जरीमरी, साकीनाका येथे एका 'कट्टरपंथीय' व्यक्तीकडून धार्मिक तेढ निर्माण करुन स्थानिक हिंदू कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शुक्रवारी (दि.१५) घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबाची चौकशी केली. मंत्री लोढा यांनी सर्व प्रकरण समजून घेऊन  कुटुंबांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या या संशयिताचे अनधिकृतरित्या उभारलेले ५ मजली घर तोडण्याचे निर्देश दिले. मंत्री लोढा यांच्या निर्देशानुसार महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. या घराचा फक्त तळ मजला शिल्लक राहिला आहे. Mumbai Sakinaka News

याबाबत बोलताना मंत्री लोढा म्हणाले की, जरीमरी येथील घटनेचा आढावा घेऊन लक्षात आले की, येथेही हिंदूंना त्रास देऊन प्रताडित करण्याचे मालवणी पॅटर्न सुरू आहेत. हे बंद झाले पाहिजे. यासाठी योग्य ती कारवाई करू. येथील भूमीपुत्रांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. Mumbai Sakinaka News

या भागात स्थानिक हिंदू कुटुंबावर हल्ला करणाऱ्या संशयिताकडून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भिंतीला लागूनच अतिक्रमण करत ५ मजली अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यालगत असलेल्या मंदिरात नित्यनियमाने पूजा करणाऱ्या हिंदू नागरिकांना या संशयिताद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने त्रास दिला जात होता. स्थानिक नागरिकांनी तब्बल ४० तक्रारी दाखल करून सुद्धा पोलीस या घटनेकडे कानाडोळा करत होते. संशयिताने शुक्रवारी (दि.१५) सूड घेण्याच्या भावनेने आपल्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या हिंदू नागरिकांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news