

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा वसमत तालुक्यात अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. रविवारी रात्री १० वाजून ८ मिनिटांनी भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली. त्यामुळे भीतीपोटी गावकरी रस्त्यावर आले होते. काही गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला संपर्क साधला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे किती रिश्टर स्केलचे हादरे बसले आहेत हे मात्र कळू शकले नाही.
पांग्रा शिंदे येथे आवाज येत जमीन हादरली. याच प्रकारे गत पाच वर्षांपासून भूकंपाचे हादरे तालुक्यास बसत आहेत. या धक्क्याची कोठेही नोंद नाही. मात्र भीती व्यक्त केली जात आहे. वसमत तालुक्यात गत चार ते पाच वर्षांपासून भूगर्भातून आवाज येत जमीन हादरण्याच्या घटना घडल्या आहेत. तीन ते चार वेळा भुकंपाची नोंद देखील झाली आहे.
१७ मार्च रोजी रात्री १०.८ मिनिटांनी पांग्रा शिंदे व परीसरात भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली आहे. त्यामुळे गावातील नागरीकांत भीती व्यक्त केली जात आहे. यापुर्वीही अनेक वेळा भुगर्भातुन आवाज येत जमीन हादरण्याच्या घटना घडल्या आहेत.
हेही वाचा :