Sushma Andhare : एकीकडे महाराष्‍ट्र दुष्‍काळात होरपळतोय.. भाजप आमदार फुकेंच्‍या मुलाच्या गाडी अपघातावर अंधारे काय म्हणाल्या?

Sushma Andhare on Phuke son car accident : यथार्थ परिणय फुकेसह कारमधील सर्वजण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा गंभीर आरोप
भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत गाडीचा अपघात केल्‍याचा आरोप फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला आहे.
भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत गाडीचा अपघात केल्‍याचा आरोप फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला आहे.
Published on: 
Updated on: 

Sushma Andhare on Phuke son car accident : एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळात होरपळून जात आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रातल्या आमदारांची पोरं मात्र भरधाव वेगाने गाड्या फिरवत आहेत. कुणाचा जीव गेला तरी यांना कुठे फरक पडतो?, असा सवाल करत शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत गाडीचा अपघात केल्‍याचा आरोप फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला आहे.

एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळात होरपळतोय....

सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळात होरपळून जात आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या आमदारांची पोरं मात्र भरधाव वेगाने गाड्या फिरवत आहेत. "कुणाचा जीव गेला तरी यांना कुठे फरक पडतो?"

भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत गाडीचा अपघात केल्‍याचा आरोप फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला आहे.
Sushma Andhare | आल्या गेल्याचा विचार करू नका : सुषमा अंधारे

एका तरुणाचा जागीच मृत्यू, पाच जणांची प्रकृती अतिगंभीर

चार दिवसांपूर्वी पेंच अभयारण्य मध्य प्रदेशकडून नागपूरला येताना या गाडीचा अपघात झाला. भरधाव वेगाने पाच मुले व पाच मुली दारूच्या नशेत गाडी चालवत असताना हा अपघात झाला. दिशांत अली या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जणांची प्रकृती अतिगंभीर असल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

सर्वजण दारू पिऊन होते, आमदार फुकेचा मुलगा गाडी चालवत होता

भाजप आमदार फुकेचा मुलगा गाडी चालवत होता, गाडीतील सर्वजण मोठ्या प्रमाणात दारू पिऊन होते, असा गंभीर आरोप करत या प्रकरणी मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील कुरई पोलीस स्टेशनमध्ये खमी व्यक्तीची रुग्णालयात वैद्यकीय-न्यायवैद्यक प्रकरण (एमएलसी) म्हणून नोंद करण्यात आली, असेही अंधारे यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत गाडीचा अपघात केल्‍याचा आरोप फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला आहे.
Sushma Andhare News: मी माफी मागणार नाही! हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास सुषमा अंधारेंचा नकार

अपघातग्रस्त वाहन फुके यांच्या नावावर

भारतीय जनता पार्टीचे आमदार परिणय फुके यांचा मुलगा गाडी चालवत होता. अपघात झालेली गाडी सुद्धा फुके यांच्याच नावावर आहे. या अपघातात गाडी चालक यथार्थ परिणय फुके गंभीर जखमी झाला आहे, असेही अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांनी कार्यालयाचे फोन नंबर, तसेच अपघातग्रस्त वाहनाचा नंबरही नमूद केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.