Sushma Andhare | आल्या गेल्याचा विचार करू नका : सुषमा अंधारे

उपनेत्या सुषमा अंधारे : मोहोळमध्ये विचारविनिमय बैठक
Sushma Andhare | आल्या गेल्याचा विचार करू नका : सुषमा अंधारे
Published on
Updated on

पोखरापूर : मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेना फोडणारे असतील तर उद्धव ठाकरे हे शिवसैनिक पेरणारे आहेत. त्यामुळे आल्या गेल्याचा विचार करत बसू नका. आपल्याला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा. शिवसेनेच्या रामरक्षा कार्यक्रमाची तयारी करा असा सल्ला उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मोहोळ येथे विचार विनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीत उपस्थित शिवसैनिकाची मते जाणून घेण्यात आली. उपजिल्हाप्रमुखासह तालुका स्तरावरील रिक्त पदाच्या नियुक्त्या करण्याबाबत इच्छुकांची नावे घेण्यात आली असून लवकरच या निवडी जाहिर करण्यात येतील असेही त्या म्हणाल्या.

यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण काकडे, पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, लोकसभा प्रमुख संजय पौळ, विक्रांत काकडे, मोहोळ विधानसभा संपर्कप्रमुख हुजूर इनामदार, तालुकाप्रमुख अशोक भोसले, माजी नगरसेविका सीमा पाटील, नगरसेविका स्वप्नाली जाधव, शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक सत्यवान देशमुख, युवासेनेचे महेश देशमुख, बाळासाहेब वाघमोडे, तुकाराम माने, दिलीप टेकाळे, मनोज नागणे,सौरभ देशमुख, दिलीप मोटे, संतोष चव्हाण, विनोद आंबरे, विनोद भोसले, दीपक शिरसाट, लिंगराज होनमाने आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news