Delimitation Bill : शरद पवारांची मनधरणी सुरूच; आज सोनिया गांधींसह काँग्रेस अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे घेणार भेट

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही भेट घेण्याची शक्यता
Delimitation Bill
Delimitation Bill Pudhari News
Published on: 
Updated on: 

Delimitation Bill : परिसीमन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. आता ‘इंडिया’ आघाडीतील काही महत्त्वाचे नेते शरद पवार इंडिया आघाडीपासून दूर जाऊ नयेत म्हणून त्यांची मनधरणी करत आहेत. आज (दि. २९) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी मुंबईत शरद पवारांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेते चेन्नईनंतर थेट मुंबईत येणार आहेत.

राहुल गांधीही उपस्‍थित राहण्‍याची शक्‍यता

महाविकास आघाडीच्या स्थापनेत शरद पवार आणि संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. मात्र, आता पवार वेगळी भूमिका घेत असतील तर तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे या भेटीनंतर राऊत नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल गांधीही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय राऊतही भेट घेणार

शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत परिसीमन विधेयकावरून शरद पवारांवर निशाणा साधला होता. त्‍याचबरोबर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या बिलासंदर्भात वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळताच, संजय राऊत यांनी यावरून जोरदार टीका केली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर राऊत आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता असल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.