Sharad Pawar Parth Pawar Assets: राज्यसभा निवडणुकीतून उघड झाला आकडा; आजोबा शरद पवारांपेक्षा नातू पार्थ पवार अधिक श्रीमंत

प्रतिज्ञापत्रातून संपत्तीचा तपशील समोर; शरद पवारांकडे 60.71 कोटी तर पार्थ पवारांकडे 88.33 कोटींची मालमत्ता
Sharad Pawar Parth Pawar Assets
Sharad Pawar Parth Pawar AssetsPudhari
Published on
Updated on

मुंबई : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणातील एक रंजक माहिती पुढे आली आहे. राजकारणातील प्रभावी घराणे असणाऱ्या पवार कुटुंबातील आजोबा अर्थात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांचे नातू म्हणजेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे दोघे राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत; पण या निवडणुकीच्या निमित्ताने आलेल्या संपत्तीच्या आकडेवारीवरून आजोबा शरद पवार यांच्यापेक्षा नातू पार्थ पवार हे श्रीमंत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sharad Pawar Parth Pawar Assets
Nashik Bribery Case: नाशिकमध्ये 20 लाखांच्या लाचप्रकरणी राज्य कर उपायुक्तांसह तिघांना अटक

निवडणूक आयोगाकडे शरद पवार आणि पार्थ पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्या अर्जासोबत नियमानुसार या दोघांनी आपल्या संपत्तीचा तपशील असलेले प्रमाणपत्र सादर केले आहे. यामध्ये पार्थ पवारांकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापेक्षा जास्त संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sharad Pawar Parth Pawar Assets
Mumbai Water Shortage: मुंबईत पाणीटंचाई कायम; दादरसारख्या मध्यवर्ती भागातही नागरिकांची पाण्यासाठी वणवण

या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे एकूण 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर पार्थ पवार यांच्या नावे एकूण 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता आहे.

दोघांच्या मालमत्तेचा तपशील

शरद पवार यांची मालमत्ता

जंगम मालमत्ता 44 कोटी 72 लाख रुपये, रोख रक्कम : 1 लाख 25 हजार रुपये

बँका व वित्तसंस्थांमधील मुदत ठेवी : 11 कोटी 66 लाख रुपये

समभाग, म्युचुअल फंडस्‌‍ आदी : 27 कोटी रुपये

सोने व चांदीचे दागिने वस्तू : 3 कोटी 85 लाख रुपये

स्थावर मालमत्ता : बारामतीतील शेती, घर, सदनिका आदी मालमत्तेचे सध्याचे अंदाजे मूल्य : 15 कोटी 99 लाख रुपये

दायित्व : सुप्रिया एंटरप्रायझेसचे सुमारे 49 लाख 84 हजार रुपये दायित्व

एकूण मालमत्ता : 60 कोटी 71 लाख रुपये

Sharad Pawar Parth Pawar Assets
Mumbai Central Railway: मध्य रेल्वेचा आज मेगा ब्लॉक; हार्बर मार्गावर सीएसएमटी–पनवेल लोकल पाच तास बंद

पार्थ पवार यांची मालमत्ता

जंगम मालमत्ता : 11 कोटी 35 लाख रुपये

बँका, टपाल विभाग, विमा व वित्तसंस्थांमधील मुदत ठेवी :

3 कोटी 68 लाख रुपये

समभाग, म्युच्युअल फंडस्‌‍ आदी :

1 कोटी 17 लाख रुपये

सोने-चांदीचे दागिने वस्तू :

1 कोटी 31 लाख रुपये

स्थावर मालमत्ता : बारामती तालुक्यातील

शेतजमिनी, पुण्यातील घर याचे सध्याचे अंदाजे मूल्य

: 76 कोटी 98 लाख रुपये

बँका किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज : 92 लाख 48 हजार रुपये

एकूण मालमत्ता : 88 कोटी 33 लाख रुपये 300 रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news