Mumbai Central Railway
Mumbai Central RailwayPudhari

Mumbai Central Railway: मध्य रेल्वेचा आज मेगा ब्लॉक; हार्बर मार्गावर सीएसएमटी–पनवेल लोकल पाच तास बंद

माटुंगा–मुलुंड जलद मार्गावरही कामे; कुर्ला–वाशी दरम्यान अप-डाउन हार्बर सेवा प्रभावित, काही गाड्या रद्द
Published on

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार 8 मार्चला मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गासह हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर ब्लॉक असल्यामुळे सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकल पाच तास बंद ठेवण्यात येणार आहेत.

Mumbai Central Railway
Mahavitaran Contract Workers: महावितरणच्या 1316 कंत्राटी यंत्रचालकांना 4 महिन्यांपासून पगार नाही; उपासमारीची वेळ, मोर्चाचा इशारा

मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)

कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्ग

कधी : सकाळी 11.20 ते दुपारी 3.45 पर्यंत

परिणाम : डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि 15 मिनिटे उशिराने पोहचतील.

ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबतील. माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर वळवल्या जाणार, आणि 15 मिनिटे उशिरा पोहचतील.

Mumbai Central Railway
Maharashtra Girls Education: 8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुलींना उच्च शिक्षणासाठी 100% शुल्कमाफी

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला ते वाशी

कधी : सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत

परिणाम : सीएसएमटी येथून वाशी,बेलापूर,पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत बंद राहतील

- पनवेल,बेलापूर, वाशीहून सीएसएमटीला जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या सकाळ8 10.17 ते दुपारी 3.47 पर्यंत रद्द

- ब्लॉक काळात सीएसएमटी - कुर्ला व पनवेल - वाशी विभागांवर विशेष लोकल

- ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी, नेरुळ मार्गाने सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news