Political News: एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांकडून शरद पवारांची भेट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फोनवरून विचारपूस

शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. डॉक्टरांनी प्रकृती सामान्य असल्याचे कळवले असून शनिवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
Political News
Political NewsPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, उद्योगपती गौतम अदानी यांनी भेट घेऊन विचारपूस केली.

पवार यांच्‍या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर आम्ही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी डॉक्टर आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबीय होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Political News
MPSC Group C Recruitment 2026: एमपीएससी गट-क भरतीत मोठी वाढ; आता १६ हजार ७१७ पदांसाठी परीक्षा

पवार यांची तब्येत उत्तम आहे. डॉक्टरांनीही सगळे नॉर्मल असल्याचे सांगितले आहे. शनिवारी डिस्चार्जही होईल.

त्यांची प्रकृती उत्तम आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांना फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Political News
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला नवे वळण; सुनील तटकरे यांच्या वक्तव्याने संभ्रम

दरम्यान, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, खासदार मिलिंद देवरा, यांनी शरद पवारांची भेट घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.