MPSC Group C Recruitment 2026: एमपीएससी गट-क भरतीत मोठी वाढ; आता १६ हजार ७१७ पदांसाठी परीक्षा

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी आधी जाहीर केलेल्या ५,७०७ पदांमध्ये आणखी ११,०१० पदांची भर पडली आहे.
Recruitment
RecruitmentPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील पदसंख्येत ऎतिहासिक वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ५ हजार ७०७ पदांसाठी जाहीर झालेल्या या परीक्षेत आता आणखी ११ हजार १० पदांचा समावेश करण्यात आला असून, एकूण १६ हजार ७१७ पदे भरली जाणार आहेत.

एमपीएससीने याबाबतचे पत्रक जारी केले आहे. त्यामुळे भरती परीक्षेतील सुधारणेसाठी नेमलेल्या व्ही. राधा समितीने आपल्या अंतरिम अहवालात केलेल्या शिफारशींची राज्य सरकारने तातडीने अंमलबजावणी केल्याचे मानले जात आहे.

Recruitment
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला नवे वळण; सुनील तटकरे यांच्या वक्तव्याने संभ्रम

राज्यातील भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी नेमलेल्या व्ही. राधा समितीच्या अंतरिम अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने एमपीएससीने पदसंख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

आयोगास प्राप्त झालेल्या अतिरिक्त मागणीपत्रांनुसार पदसंख्येत वाढ करण्यात आली आहे. नव्याने ११ हजार १० पदांचा समावेश झाल्याने एकूण पदसंख्या १६ हजार ७१७ झाली आहे.

Recruitment
BDD Chawl Redevelopment: बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती; लोअर परळमधील ५५७ रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्या

दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाच्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी पात्र उमेदवारांनाही मिळणार आहे.

वाढीव पदसंख्येच्या अनुषंगाने उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच, यापूर्वी अर्ज केलेल्या आणि शैक्षणिक अर्हतेनुसार नव्याने समाविष्ट झालेल्या एकापेक्षा अधिक संवर्गांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना विकल्प सादर करता येणार आहेत. त्यासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

नव्याने अर्ज तसेच विकल्प सादर करण्यासाठी १३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोगाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यमान तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर १५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला अभ्यासक्रम लागू राहणार असून परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल.

यापूर्वीची सर्वाधिक भरती ७ हजारांची

एमपीएससीच्या गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या ५ हजार पदांसाठी सुमारे १२ लाख उमेदवारांनी अर्ज केले. दरम्यान, राज्य शासनाच्या विविध विभागांनी सुमारे ११ हजारांहून अधिक पदांची मागणी केली.

त्यामुळे या परीक्षेसाठी पदांची संख्या ११ हजारांनी वाढवून १६ हजारांवर नेण्याची शिफारस व्ही. राधा समितीने आपल्या अंतरिम अहवालात केली होती. विशेष म्हणजे यापुर्वीची सर्वात मोठी भरती ही ७ हजार पदांची होती. त्यामुळे आता होणारी भरती ही ऎतिहासिक संख्येची ठरली आहे.

पूर्व परीक्षा २४ जानेवारी २०२७ रोजी

वाढीव पदसंख्येमुळे नव्याने अर्ज स्वीकारणे आणि यापूर्वी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांकडून विकल्प घेण्यासाठी पुरेसा कालावधी देणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ३ जानेवारी २०२७ रोजी नियोजित असलेली ही परीक्षा आता २४ जानेवारी २०२७ रोजी घेण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.