Salman Khan Security: सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ; अमेरिकन लष्कर वापर असलेल्या Heckler & Koch गन धारक कमांडोंचा समावेश

आधीच सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात असणाऱ्या सलमान खानच्या सुरक्षेत अजून वाढ करण्यात आली आहे.
Salman Khan Security
Salman Khan Securitypudhari
Published on: 
Updated on: 

Salman Khan Security: टायगर श्रॉफवर भर रस्त्यात गोळीबार झाल्यानंतर अख्ख बॉलीवूड हादरलं असून बिश्नोई गँगचा मुख्य टार्गेट सलमान खानच्या सुरक्षेत देखील त्वरित वाढ करण्यात आली आहे. आता मुंबई पोलिसांसह कमोंडोंची देखील सुरक्षा सलमान खानला देण्यात आली आहे.

बिश्नोई गँगच्या रडारवर टायगर श्रॉफ नव्हता तर मोठा अभिनेता होता असा दावा तपासात समोर आला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सलमान खान बिश्नोई गँगच्या रडावर असून त्यालाच मारण्याचा कट होती मात्र तो फसल्यावर टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Salman Khan Security
Salman Khan: "माझ्या आयुष्यातील गुपिते माझ्यासोबतच कबरीत गाडली जातील"; सलमान खानने बायोपिकबाबत स्पष्टच सांगितलं

सलमानची सुरक्षा वाढवली

या पार्श्वभूमीवर आधीच सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात असणाऱ्या सलमान खानच्या सुरक्षेत अजून वाढ करण्यात आली आहे. आता त्याच्या सुरक्षेत अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या जवानांचा समावेश करण्यात आला आहे. या जवानांकडे आता इम्पोर्टेट अशी एमपी५ एसडी६ सबमशीन गन असणार आहे.

विशेष म्हणजे ही सबमशिन गन ९ बाय १९ एमएम पॅराबेलम कॅलिपरच्या गोळ्यांसाठी डिझाईन करण्यात आली आङे. इंटिग्रेटेड सप्रेसरमुळे फायरिंगचा आवाज आणि फ्लॅश कमी करण्यासाठी या गनमध्ये विशेष रचना करण्यात आली आहे.

Salman Khan Security
Salman Khan Children: ६० वर्षाचा सलमान म्हणतो एक दिवस माझीही मुले असतील.. भावनिक आधार अन् कुटुंबाबतही भरभरून बोलला

खास सबमशिन गनचा समावेश

हॅकलरेन अँड कूच कंपनीची ही गन असून ही गन खासकरून अमेरिकन लष्कर वापरतं. ही गन त्याच्या ऑटोमॅटिक फायरिंगची क्षमता आणि वेग यासाठी ओळखली जाते. या गनच्या मॅगझीन या १५ आणि ३० अशा दोन राऊंडच्या पर्यायात उपलब्ध आहेत.

याचा आकार ओटोपशीर असल्यामुळे आणि जवळच्या अंतरासाठी ही गन अत्यंत सुरक्षित समजली जाते. एमपी ५ एसडी ६ ही गन जगभरात विशेष सुरक्षा आणि लष्करी दलांकडून मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. अत्यंत गंभीर परिस्थिती देखील हे शस्त्र चांगल्या प्रकारे वापरता येतं. आता ही गन सलमान खानच्या सुरक्षा ताफ्यातील कमांडोकडे असणार आहे. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेचा स्तर किती वाढवण्यात आला आहे हे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news