Devendra Fadnavis: 'जलयुक्त शिवार ३.०' मध्ये 'वृक्षाधारित शेती' राबवणार : मुख्यमंत्री फडणवीस

राज्याच्या 'जलयुक्त शिवार ३.०' अभियानामध्ये 'वृक्षाधारित शेती' या संकल्पनेचा समावेश केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Devendra Fadnavis Sadhguru Global Peace Honours 2026
Devendra Fadnavis Sadhguru Global Peace Honours 2026File Photo
Published on: 
Updated on: 

Devendra Fadnavis Sadhguru Global Peace Honours 2026

मुंबई : "धरणांमध्ये पाणी साठवण्यावर भर देण्याऐवजी आता मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्याकडे लक्ष वळवले पाहिजे. राज्याला वारंवार भेडसावणाऱ्या जलसंकटावर दीर्घकालीन उपाय म्हणून 'वृक्षाधारित शेती' करण्याची गरज आहे," असे प्रतिपादन सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी केले. सद्गुरूंच्या या सूचनेची दखल घेत, राज्याच्या 'जलयुक्त शिवार ३.०' अभियानामध्ये 'वृक्षाधारित शेती' या संकल्पनेचा समावेश केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शनिवारी (दि. २१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सद्गुरूंना 'ग्लोबल पीस ऑनर्स 2026' पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी सदगुरू जग्गी वासुदेव म्हणाले की, भारत पाण्यासाठी जवळजवळ पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहे. नदी म्हणजे मातीतून ओसंडून वाहणारे पाणी. तलावही मातीतूनच ओसंडून भरतो. त्यामुळे पाणी मातीत टिकून राहायचे असेल, तर तिथे वनस्पती हव्यातच. नाहीतर मुसळधार पाऊस, महापूर आणि त्यानंतर तीन महिन्यांच्या आतच दुष्काळाचा तडाखा, असा उलटा फेरा सुरू राहील," असे ते म्हणाले. वृक्षाधारित शेतीच्या माध्यमातून शेतजमिनींवर पुन्हा झाडे लावावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. नेहमीच्या पिकांसोबत झाडे लावली तर शेतकऱ्यांना आपली सध्याची पिके सोडावी न लागता मातीचे आरोग्य, पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न यात लक्षणीय सुधारणा होऊ शकते, असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis Sadhguru Global Peace Honours 2026
CM Devendra Fadnavis | दुष्काळ निवारणासाठी राज्यातील १८ हजार गावांत जलपुनर्भरण

'सेव्ह सॉईल - कावेरी कॉलिंग' अंतर्गत ईशा फाऊंडेशनच्या कार्यातून निदर्शनास आलेले परिणाम सांगताना सद्गुरू म्हणाले की, तमिळनाडू व कर्नाटकात वृक्षाधारित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न सहा ते आठ वर्षांत ३०० ते ८०० टक्क्यांनी वाढले असून, मातीतील सेंद्रिय घटक आणि जलधारणक्षमता यात देखील भरीव सुधारणा झाली आहे. नुसती मोठ्या संख्येने झाडे लावून भागणार नाही; वृक्षाधारित शेतीचे पूर्ण लाभ मिळवायचे असतील, तर ती शास्त्रशुद्ध पद्धतीनेच राबवली पाहिजे.

यावेळी सद्गुरूंनी मुख्यमंत्र्यांनी सद्गुरू व ईशा फाऊंडेशनसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आणि ही पद्धत राज्याच्या जलसंधारण कार्यक्रमात समाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रातील जलसंधारण बळकट करण्याच्या उद्देशाने आखलेल्या 'जलयुक्त शिवार ३.०' कार्यक्रमात राज्य शेतजमिनींवरील वृक्षलागवडीचा समावेश करेल. शेताच्या बांधांवर झाडे लावल्याने मातीचे संवर्धन होईल आणि भूजल पुनर्भरणालाही हातभार लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

या पुरस्कार सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सचिन तेंडुलकर, उद्योगपती अनंत अंबानी, अभिनेता शाहरुख खान, रणवीर सिंग, सुनील शेट्टी, बोमन इराणी आणि विक्रांत मेस्सी, जेएसडब्ल्यू समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल आणि उपस्थित होते.

Devendra Fadnavis Sadhguru Global Peace Honours 2026
Devendra Fadnavis : देव कधी भाषा, प्रांताचा भेद करत नाहीत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.