Devendra Fadnavis : देव कधी भाषा, प्रांताचा भेद करत नाहीत

जुहू येथील छठपूजेच्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावना
Chhath Puja Celebration
मुंबई : जुहू चौपाटी येथील छठपूजा महोत्सवात सहभागी झालेले मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस. यावेळी भाजपचे मुंबई अध्‍यक्ष आ. अमित साटम आदी उपस्‍थित होते. pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : देवदेवता कधी कोणता भेदभाव करत नाहीत. कोणत्याही जातीचा, प्रांताचा, अमुक भाषा बोलणारा, गरीब-श्रीमंत असा भेद तिथे नसतो. भक्तीभावाने ओंजळभर पाण्याचा अर्घ्य दिला तरी छठीमैय्या आणि सूर्यनारायणाचा आशीर्वाद लाभतो, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी छठपूजेच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. भारतीय सण-उत्सव हे सनातन संस्कृतीचा आविष्कार असून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

जुहू चौपाटी येथे आयोजित भव्य छठपूजा महोत्सवात सहभागी होऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित भाविकांना छठपर्वाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार अमित साटम, माजी आमदार कृपाशंकर सिंह, छठपूजेचे आयोजक मोहन मिश्रा, दिवाकर मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय सण आणि उत्सव हे आपल्या प्राचीन आणि सनातन संस्कृतीचा आविष्कार असून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Chhath Puja Celebration
Rashi Bhavishya Today: आज या राशीला आर्थिक लाभाची दाट शक्यता.. मात्र एका गोष्टीवर ठेवावं लागणार नियंत्रण

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छठपूजेच्या निमित्ताने जुहू चौपाटीवर एकीकडेे पाण्याचा अथांग सागर आणि दुसरीकडे भक्तांचा महासागर असे दोन सागर एकाच वेळी पाहायला मिळत आहेत. सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करण्यासाठी आणि छठी मैयाचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक श्रद्धेने एकत्र आले आहेत.

सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत असून त्याच्या प्रकाशामुळेच सृष्टीतील जीवसृष्टी आणि वनस्पतींचे जीवन शक्य होते. मानवी जीवन, शेती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी सूर्यनारायणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा छठपर्व हा महत्त्वाचा उत्सव आहे.

Chhath Puja Celebration
Shrigonda Cotton Mill Fire: श्रीगोंद्यात कापूस जिनिंग मिलला भीषण आग; चार कोटींच्या कापसाच्या गाठी जळून खाक!

यावेळी आमदार अमित साटम यांनी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मुंबईत सध्या सात ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू असून, त्यामुळे प्रक्रिया केलेले सांडपाणीच समुद्रात सोडण्यास मदत होणार आहे. जुहू चौपाटीसह मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आमदार साटम यांनी सांगितले.

छठव्रती महिलांसाठी कायमस्वरूपी सुविधा

  • छठपूजेच्या आयोजनाबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, २०१४ पासून छठव्रती माता-भगिनींच्या सुरक्षिततेसह त्यांच्या सोयी-सुविधांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

  • निर्जला व्रत करणाऱ्या महिला रात्रीच्या वेळीही पूजेसाठी चौपाटीवर उपस्थित असतात. त्यांची सुरक्षितता आणि आवश्यक सुविधांची काळजी घेणारी कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.