Sunetra Pawar: रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेत; पाहा काय म्हटलंय?

Ashok Kharat video Rupali Chakankar: अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर आज सुनेत्रा पवार यांनी याबाबत 'एक्स' वर पोस्ट केली आहे.
Sunetra Pawar on Rupali Chakankar resignation
Sunetra Pawar on Rupali Chakankar resignationfile photo
Published on
Updated on

Sunetra Pawar on Rupali Chakankar resignation

मुंबई: अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या 'देवगिरी' बंगल्यावर भेट घेतल्यानंतर आणि त्यांच्यासोबतच्या चर्चेनंतर चाकणकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबरोबरच राष्ट्रवादी (अजित पवार) महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. यानंतर आज सुनेत्रा पवार यांनी याबाबत 'एक्स' पोस्ट केली आहे.

Sunetra Pawar on Rupali Chakankar resignation
Niphad News: निफाडचा आणखी एक 'भोंदू' चर्चेत; मंदिरासाठी 55 कोटींचा खर्च, कार्यक्रम पत्रिकेत CM, DCM यांचे नाव

महिलांवरील बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला स्वयंघोषित ज्योतिषी भोंदूबाबा अशोक खरात याला पाठीशी घालणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना या पदाचा तातडीने राजीनामा द्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले होते.

सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. माझा खरात याच्या ट्रस्टबाबत संबंध आहे. मात्र, त्याच्या कारनाम्याबाबत मला माहिती नाही, असे स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी रूपाली चाकणकर यांची बाजू फेटाळून लावली. त्यांना तत्काळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या, असे स्पष्ट आदेश दिले.

सुनेत्रा पवार यांनी पोस्टमध्ये काय म्हटले?

आज सुनेत्रा पवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहीले आहे की, "महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवत आहे."

Sunetra Pawar on Rupali Chakankar resignation
Ashok Kharat Case | नवरा-बायकोचा बुद्धिभेद करून खरातने उद्ध्वस्त केले शेकडो संसार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news