Niphad News: निफाडचा आणखी एक 'भोंदू' चर्चेत; मंदिरासाठी 55 कोटींचा खर्च, कार्यक्रम पत्रिकेत CM, DCM यांचे नाव

Niphad Temple News: कार्यक्रम पत्रिकेत थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आमदार, खासदारांची नावे
Bhondu Baba
Bhondu Baba
Published on
Updated on

Niphad Bhondu Baba News

नाशिक : लैंगिक शोषणाच्या आरोपात पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या भोंदू अशोक खरातचे एका पाठोपाठ एक कारनामे उघड होत असतानाच, महिलांच्या लैंगिक आणि आर्थिक शोषणाच्या आरोपात जामिनावर असलेला एक स्वयंघोषित पीठाधीश्वर चर्चेत आला आहे. निफाड तालुक्यात ५५ कोटी रुपये खर्चून एका मंदिराचा प्राणप्रतिष्ठा कलशारोहण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री, आमदार-खासदारांची प्रमुख अतिथी म्हणून नावे आहेत. ही निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भोंदू अशोक खरातचे कारनामे चर्चेत असतानाच, लैंगिक शोषणासह अन्य आरोपांमध्ये जामिनावर बाहेर असलेला स्वयंघोषित पीठाधीश्वर भोंदू बाबा चर्चेत आला आहे. निफाड तालुक्यात एक मंदिर उभारले आहे. तेथे विविध कार्यक्रम होत आहेत. या सोहळ्याचा निमंत्रक हा बाबा आहे. त्याच्यावर नाशिक शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून, तो या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेला आहे.

Bhondu Baba
Girish Mahajan : भक्ताला मारहाण प्रकरणी तातडीने कठाेर कारवाई करा

दरम्यान, या कार्यक्रमाची पत्रिका समाज माध्यमांवर व्हायरल होत असून, त्यात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ, माजी मंत्री माणिकराव कोकाटे, खा. भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, आ. दिलीप बनकर, आ. सुहास कांदे, आ. नरेंद्र दराडे, आ. किशोर दराडे, आ. अ‍ॅड. राहुल ढिकले, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. सरोज आहिरे, माजी आमदार अनिल कदम, बाळासाहेब सानप, माजी नगरसेवक गणेश गिते, कमलेश बोडके आदींची नावे छापण्यात आलेली आहेत.

या सगळ्या प्रकरणावरून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री या सोहळ्याला येणार की, त्यांच्या नावाचा गैरफायदा घेतला जात आहे असेही अंनिसने म्हटले आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणी लक्ष द्यावे, अशी मागणी अंनिसने केली आहे.

Bhondu Baba
Nashik Crime News : नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेची 'ऐशीतैशी'

प्रमुख अतिथी

  • मा. देवेंद्रजी फडणवीस (मुख्यमंत्री, महा. राज्य)

  • मा. एकनाथजी शिंदे (उपमुख्यमंत्री, महा. राज्य)

  • मा. गिरीषजी महाजन (कॅबिनेट मंत्री, नाशिक)

  • मा. छगनरावजी भुजबळ (अन्न नागरी पुरवठा मंत्री, महा. राज्य)

  • मा. दादाजी भुसे (सार्वजनिक बांधकाम मंत्री, महा. राज्य)

  • मा. नरहरीजी झिरवाळ (अध्यक्ष, विधान सभा, महा. राज्य)

  • मा. सुहास अण्णा कांदे (आमदार तथा सभापती वि. स.)

  • मा. राजाभाऊ वाजे (खासदार, नाशिक)

  • मा. भास्करराव भगरे (खासदार, दिंडोरी)

  • मा. नरेंद्रजी दराडे (आमदार, विधान परिषद)

  • मा. किशोरजी दराडे (आमदार, शिक्षक मतदार संघ, नाशिक)

  • मा. दिलीपजी बनकर (आमदार, निफाड)

  • मा. माणिकराव कोकाटे (आमदार, सिन्नर)

  • मा. सीमाताई हिरे (आमदार, नाशिक पश्चिम)

  • मा. देवयानीताई फरांदे (आमदार, नाशिक मध्य)

  • मा. राहुल ढिकले (आमदार, नाशिक पूर्व)

  • मा. सरोजताई आहिरे (आमदार, देवळाली)

  • मा. अनिल कदम (मा. आमदार, निफाड)

  • मा. बाळासाहेब सानप (मा. आमदार, नाशिक पूर्व)

  • मा. गणेश गिते (मा. स्थायी समिती सभापती, नाशिक)

  • मा. कमलेशभाऊ बोडके (नगरसेवक तथा मा. सभागृह नेता, नाशिक)

या प्रकरणात उपस्थित झालेले प्रश्न

  • महिलांच्या शारीरिक आणि आर्थिक शोषणाचे गुन्हे दाखल असलेल्या भोंदू बाबाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार काय?

  • निमंत्रण पत्रिकेत प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्र्यांचे नाव प्रसिद्ध करताना मुख्यमंत्री कार्यालयाकडे विचारणा केली गेली काय?

  • या सोहळ्यासाठी जर मुख्यमंत्री येत नसतील तर त्यांच्या नावाचा फायदा घेतला जातोय का?

  • गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील गुन्हेगार सार्वजनिक सोहळे आयोजित करीत असताना याकडे पोलिस लक्ष देतील का?

Bhondu Baba
Vinod Palyekar Case | तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून माजी मंत्र्यांकडून लैंगिक अत्याचार

तीन प्रकरणांमध्ये चार्जशीट

इंदिरानगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाडमधील भोंदूवर तीन प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. तर तीन प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. आरोपी सध्या जामिनावर असून पुढील तपास सुरू आहे.

"निफाड तालुक्यातील भोंदू बाबावर शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्यासह अन्य पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर असून, त्याने निफाड तालुक्यात तब्बल ५५ कोटींचे मंदिर उभारले आहे. डिसेंबर २०२० मध्ये आम्ही त्याचे पाथर्डी फाटा येथील मंदिर बंद केले होते. मात्र, अशातही त्याने ग्रामीण भागात मंदिर उभारले. या मंदिराच्या सोहळ्यासाठी त्याने मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले आहे. पोलिसांनी याबाबत कारवाई करावी."

- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news