Rohit Pawar : तो मफलरवाला नेता कोण.... अखेर रोहित पवारांनी सहाव्या पत्रकार परिषदेत दिलं उत्तर; घेतलं माजी उपमुख्यमंत्र्यांचे नाव

मी जे नाव सांगणार आहे ते सांगितल्यानंतर मला मोठी राजकीय किंमत मोजावी लागू शकते - रोहित पवार
Rohit Pawar
Rohit PawarPudhari file photo
Published on: 
Updated on: 

Rohit Pawar Ajit Pawar Plane Crash : रोहित पवार यांनी आज अजित पवार विमान दुर्घटनेवरची आपली सहावी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेकडे तो मफलरवाला नेता कोण याचं उत्तर मिळणार म्हणून सर्वांच्या लक्ष होतं. यापूर्वी रोहित पवार यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन प्रमुख नेते सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे घेतली होती. मात्र आता त्यांनी मफलरवाला नेता कोण याचा उलगडा केला. त्यांनी माजी उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेतले.

अर्थात नाव घेण्यापूर्वी मी ज्या व्यक्तीचं नाव घेतलं त्याचा अजित दादांचा घातपात केला असं मी अजिबात म्हणत नाही असा खुलासा रोहित पवार यांनी एकदा नाही तर दोन चारवेळा केला. मात्र ज्यांच्यामुळे हा घातपात आणि अपघात झाला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला याबाबतची माहिती मी दिली आहे असे ते म्हणाले.

Rohit Pawar
Amit Shah on Ajit Pawar: "म्हणून अजितदादा 'महायुती'मध्ये आले..." : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिला आठवणींना उजाळा

सुरूवात अभंगाने केली

रोहित पवार यांनी आज संत तुकाराम यांची एक अभंगाने आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या कोटने आपल्या पत्रकार परिषदेची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या काही व्हिडिओ क्लिप्स दाखवत त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे असं सांगितलं. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांची प्रशासनावर चांगली पकड होती असं सांगितलं.

यानंतर रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत आतापर्यंत काय काय झालं. कोणी काय केलं अन् आमच्या मागण्यांबाबत काय झालं याची माहिती थोडक्यात देण्यात आली. त्यावेळी त्यांनी आमचे किती मुद्दे खरे ठरले याची देखील माहिती दिली. त्यांनी आम्ही हवेत बोलत नाही असं देखील सांगत साडेनऊ महिन्यात साआयडी आणि सरकारकडून काही माहिती आलेली नाही. एफआयर देखील दाखल झालेला नाही असं सांगित सरकारवर अप्रत्यक्षरित्या टीका केली.

Rohit Pawar
Ajit Pawar Accident Truth : ‘अजितदादांच्या अपघाताचे सत्य जनतेसमोर येऊ द्या, दोषी आढळल्यास फासावर लटकवा’

एफआयआरसाठी जंग जंग पछाडलं मात्र...

रोहित पवार यांनी याबाबत राजकारणच सुरू असल्याचं सांगितलं. रोहित पवार यांनी राजकारणी नेते मॅनेज होऊ शकतात पण जनता मॅनेज होऊ शकत नाही. आम्हाला अनेक लोकांनी यासाठी मदत केल्याचं सांगत अनेकांची नावे आम्ही सांगू शकत नाही असं वक्तव्य केलं.

रोहित पवारांनी आमचा महाराष्ट्रात एफआयआर दाखल व्हावा यासाठी जंग पछाडलं. बारामतीत आम्ही एफआयआर जवळपास दाखल केला होता. मात्र पोलीस अधिकाऱ्याला एक फोन आला अन् त्यानंतर त्यांनी आम्ही एफआयआर दाखल झाला नाही. पोलीस प्रशासनावर दबाव असल्याचा पुर्नउच्चार रोहित पवार यांनी केला. रोहित पवार यांनी सभागृहात देखील मुख्यमंत्र्यांनी असं नसतं तसं नसतं म्हणत आम्हालाच ज्ञान देण्याचा प्रयत्न केला.

Rohit Pawar
Rohit Pawar | भाजपसोबत असताना विलीनीकरणाचा विषयच येत नाही : आ. रोहित पवार

किरीट सोमय्यांचा का केला उल्लेख

भाजपचे किरीट सोमय्या यांनी २०१९ मध्ये अशाच एका प्रकरणात एफआयआर दाखल करून घेतला होता कारण त्यावेळी त्यांचे सरकार सत्तेत होते. त्यामुळं दादांना एक न्याय आणि किरीट सोमय्यांनी ज्या कुटुंबाची बाजू ९ महिने लावून धरली त्यांना वेगळा न्याय असं दिसतं.

रोहित पवार यांनी खरात प्रकरणाचा देखील उल्लेख करत अजित पवार यांच्या घराबाहेर काळी जादू झाली होती. माझा काळ्या जादूवर विश्वास नाही. मात्र ज्यांचा विश्वास आहे त्यांचा हेतू तपासणे गरजेचं आहे. जे काही त्या हेतूने काम करतात त्यांना पकडून अशी जादू का करावीशी वाटली याची माहिती घेणे गरजेचे होते असे देखील वक्तव्य केलं.

व्हीएसआर कंपनीचे मालक सिंह यांनी दादा गेल्यानंतर दोन दिवसात अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये १८ कोटींचे घर घेतले. त्यांची अमेरिकेत आलिशान गाड्यांचा ताफा आहे. त्यांनी कोडॅक ब्लॅक यांच्याकडून हे घर विकत घेतलं आहे. कोडॅक ब्लॅक हा रॅपर असला तरी त्याच्यावर ड्रग्ज तस्करीचा आरोप झाला होता.

Rohit Pawar
Rohit Pawar: २०१८ ला वळसे पाटलांचीच संमती, आता विरोध का? आमदार रोहित पवार यांचा सवाल

व्हीके सिंगच्या मुलांचे ड्रग्ज तस्कराशी संबंध?

रोहित आणि राहुल सिंग हे व्हिके सिंग यांच्या दोन मुलांचे अमेरिकेतील रॉनल लुईमा यांच्यासोबत पार्टरनशिपमध्ये कंपनी चालवतात. हा रॉनल ड्रग्ज तस्करीत सामील होता. ही सर्व माहिती आम्हाला अमेरिकन एजन्सीमधून लोकांनी दिली आहे. आता सीबीआय आणि इतर संस्थांनी ही माहिती मिळवावी.

अमेरिकेत ठेवलेले N291VK हे विमान व्हीएसआर कंपनीचेच आहे. त्यातून १.४ टन सोनं घेऊन जाऊ शकतो का असा मेसेज राहुल सिंगने केला होता. २००० कोटींचे सोनं विमानातून घेऊन जात असतील तर यावरून यांची पोहोच फार मोठ्या लोकांपर्यंत आहे. त्यामुळंच साडे नऊ महिने झाले तरी दादांना न्याय मिळालेला नाहीये. व्हीके सिंह ८०० कोटींचा व्यवहार इकडून तिकडे करत असेल आणि ईडी, इनकम टॅक्स यांना आम्ही ही माहिती दिली तरी ते काही करत नाहीत.

मोठी राजकीय किंमत मोजावी लागू शकते

दादांनी एव्हिएशनचे राज्याचे टेंडर हे चांगल्या कंपनीला देऊ इच्छित होते. मात्र एव्हिएशन मंत्रालयातून दबाव आणून ते रद्द केले गेले. व्हीके सिंगने मंत्रालयात येऊन दंगा केला होता असा देखील दावा अजित पवार यांनी केलं. आपण काकांना न्याय देऊ शकत नसेल तर मी गरिबाला न्याय कसा देऊ शकतो. मला पुढे राजकीय मोठी किंमत मोजावी लागू शकते असे देखील ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.