Ritu Tawade | मुंबईच्या महापौरपदाच्या भाजपच्या उमेदवार रितू तावडे कोण?

भाजपच्या अनुभवी आणि निष्ठावान नगरसेविका ठरणार भाजपच्‍या पहिला महापौर
Mumbai Mayor BJP Candidate Ritu Tawade
भाजपच्‍या ज्येष्ठ नगरसेविका रीतू तावडे यांनी आज महापौरपदासाठी उमेदवार अर्ज दाखल केला. Pudhari photo
Published on
Updated on

Mumbai Mayor BJP Candidate Ritu Tawade

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अखेर भाजपने आपले पत्ते उघड केले असून, ज्येष्ठ नगरसेविका रीतू तावडे यांची महापौरपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. सुरुवातीपासून महापौरपदाच्‍या शर्यतीत प्रबळ दावेदार असणार्‍या रीतू तावडे या भाजपच्या अत्यंत अनुभवी आणि निष्ठावान नगरसेविका मानल्या जातात. जाणून घेवूया रितू तावडे यांच्‍याविषयी...

रितू तावडे कोणत्या प्रभागातून निवडून येतात?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र. १३२ मधून रितू राजेश तावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. घाटकोपरसारख्या गुजरातीबहुल भागातून निवडून येणाऱ्या मराठी नगरसेविका आहेत.

Mumbai Mayor BJP Candidate Ritu Tawade
Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौर पदासाठी भाजपाकडून रितू तावडे, उपमहापौर पदासाठी शिंदे गटाचे संजय घाडी

रितू तावडेंचे वय, शिक्षण, संपत्ती किती?

18 एप्रिल 1973 त्यांची जन्मतारीख आहे. 53 वर्षीय रितू तावडे या विद्याविहार (पश्चिम) येथील रहिवासी असून त्या व्यवसायाने व्यापारी आहेत. त्यांचे शिक्षण एच.एस.सी. (बारावी) पर्यंत झाले असून, 1993 मध्ये त्यांनी मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमधून हे शिक्षण पूर्ण केले . बारावीनंतर त्यांनी कॉर्मस शाखेच्या दुसऱ्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले आहे. त्‍यांना दोन अपत्य आहेत. तावडे यांनी आपले कुटुंबाची एकुण संपत्ती सुमारे ५ कोटी २६ लाख ७६ हजार ४१७ इतकी नोंदली आहे.

Mumbai Mayor BJP Candidate Ritu Tawade
Mumbai Mayor post BJP: कौलाचा मान ठेवा; भाजपकडून शिंदे गटाला स्पष्ट संदेश

रितू तावडे यांच्‍या कुटुंबात कोण कोण?

रितु तावडे यांचे पती राजेश मधुकर तावडे हे एक व्‍यावसायिक आहेत. मुलगी मधुरा ही वकील असून मुलगा यश हा कॉम्प्युटर इंजिनीयर आहे.

गाजलेली आंदोलने...

1. जागतिक स्तरावर दखल (BBC लंडन): महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या विबत्स जाहिराती आणि पुतळ्यांविरोधात त्यांनी पुकारलेल्या लढ्याची दखल खुद्द ‘बीबीसी लंडन’ने घेतली होती. त्यांच्या आंदोलनामुळे अशा जाहिरातींवर बंदी घालण्यात आली.

2. महिला सुरक्षा: पालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी करत प्रशासनाला धारेवर धरले होते.

3. पाणी माफियांविरुद्ध लढा: घाटकोपरमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी त्यांनी काढलेला ‘हंडा मोर्चा’ अत्यंत गाजला, ज्यानंतर प्रशासनाने पाणी चोरांवर कडक कारवाई केली.

Mumbai Mayor BJP Candidate Ritu Tawade
Mumbai Mayor | दावोसहून झाला पहिला करार; महापौर ‘महायुती’चाच होणार!

रितू तावडेंनी आजवर भूषवलेले पदे

भाजप मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समिती संयोजिका. भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा, भाजप ईशान्य मुंबई महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष, नगरसेविका, मुंबई महानगरपाकिलना शिक्षण समिती अध्‍यक्षा, मुंबई उपनगरे स्थापत्य समिती उपाध्यक्षा, राज्‍य सरकारच्‍या महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍या संचालिका, केंद्र सरकारच्‍या खादी ग्रामोद्योग प्रोफेशनल ट्रेनिंग असोसिएटच्‍या सदस्‍या आदी पदे त्‍यांनी भूषवली आहेत.

रितू तावडे यांच्याकडे 'फॉर्च्युनर'सह तीन वाहने

सरकारी माहितीनुसार, रितू तावडे यांच्या नावावर सध्या तीन वाहने असून त्यात एक आलिशान कार, एक मध्यम श्रेणीतील कार आणि एका दुचाकीचा समावेश आहे. या वाहनांचा तपशील खालीलप्रमाणे ...

  • टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner): हे त्यांच्या ताफ्यातील सर्वात महागडे वाहन आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये खरेदी केलेल्या या आलिशान गाडीची किंमत ४६ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. (नोंदणी क्रमांक: MH03ER6400)

  • ह्युंदाई i20 स्पोर्ट्स (Hyundai i20 Sportz): मार्च २०१९ मध्ये त्यांनी ही कार खरेदी केली होती. याची किंमत ६ लाख ४३ हजार १३६ रुपये इतकी आहे. (नोंदणी क्रमांक: MH05EA0442)

  • होंडा ॲक्टिव्हा (Honda Activa DLX): दैनंदिन वापरासाठी त्यांच्याकडे एक दुचाकी असून, मार्च २०२४ मध्ये ती ९० हजार १५० रुपयांना खरेदी करण्यात आली आहे.

Mumbai Mayor BJP Candidate Ritu Tawade
Mumbai Mayor Formula : मुंबईचे महापौरपद अडीच - अडीच वर्षे

भाजपच्‍याच नगरसेविकेबरोबरील वाद ठरला बहुचर्चित

मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर, प्रभाग निवडीवरून भाजपच्या दोन माजी नगरसेविका, रितू तावडे आणि बिंदू त्रिवेदी यांच्यात २०२२मध्‍ये मोठा वाद झाला होता. या वादात मध्यस्थी करायला आलेले माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप रितू तावडे यांनी केला होता. या झटापटीत रितू तावडे यांच्या हाताला दुखापतही झा त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र तावडे यांनी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केली नाही. तसेच याबाबत जाहीर भाष्‍य केले नव्‍हते. मात्र नगरसेविकांमधील हाणामारी प्रकरणी त्‍यांचे नाव चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी आले होते.

Mumbai Mayor BJP Candidate Ritu Tawade
North Indian Mayor Mumbai politics: मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसवू : कृपाशंकर सिंह

अंदमान अभ्‍यास दौर्‍याही सापडला होता वादाच्‍या भोवर्‍यात

पक्षाचा झुगारून वादग्रस्त केलेला अंदमान 'अभ्यास दौऱ्यावर'मुळेही त्या वादाच्‍या भोवर्‍यात सापडल्या होता. शिक्षण समिती अध्यक्षा असताना ३४ नगरसेवक दमानच्या दौऱ्यावर गेले. त्‍यावेळी जनमानसात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेना वगळता इतर प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नगरसेवकांनी आपले दौरे रद्द केले होते.हा दौरा म्हणजे सार्वजनिक पैशातून साजरी केलेली एक सहल असल्याची टीका करत अनेक वरिष्ठ नगरसेवकांनी यापूर्वीच माघार घेतली होती. रितू तावडे यांच्यासह भाजपाच्या इतर वरिष्ठ नगरसेवकांनाही हा दौरा रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र तावडे अंदमान दौर्‍यावर गेल्‍याच. यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी तावडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केल्‍याचेही वृत्त राजकीत वर्तुळात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news