Regional Language Digital Content
Regional Language Digital ContentPudhari

Regional Language Digital Content: डिजिटल युगात मातृभाषांचा वाढता प्रभाव; इंटरनेटवर प्रादेशिक कंटेंटचा दबदबा

90% नव्या वापरकर्त्यांना स्थानिक भाषेची पसंती; एआय, व्हॉईस सर्च आणि डिजिटल मार्केटिंगमुळे प्रादेशिक भाषांना नवी चालना
Published on

90 टक्के इंटरनेट वापरकर्त्यांचे स्थानिक भाषेला प्राधान्य

2021 नंतर इंग््राजीच्या तुलनेत bप्रादेशिक भाषांच्या वापरात वाढ

ग््राामीण, निमशहरी भागातील इंटरनेट वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या मातृभाषेचा आधार

एआय, व्हॉईस सर्च आणि भाषांतरामुळे मातृभाषांचा डिजिटल वापर सुलभ

डिजिटल कंटेंट निर्मितीत प्रादेशिक मातृभाषा, बोली भाषांतून रोजगाराच्या संधी

डिजिटल मार्केटिंगसाठी प्रादेशिक भाषांचा वापर ठरतोय प्रभावी

Regional Language Digital Content
Mumbai Organ Donation: माय-लेकीच्या संवादातून अवयवदानाचा संकल्प

कोल्हापूर : अनुराधा कदम

हातात स्मार्टफोन आणि जगभराशी जोडणारे इंटरनेट. आजच्या युगात संवादाचे हे रूप आहे. मात्र आता मोबाईलच्या स्क्रीनवरून गावोगावी, घरोघरी पोहोचणारी माहिती प्रादेशिक मातृभाषेतून उपलब्ध होत आहे. बोलीभाषेतील कंटेंट निर्मितीला मिळणारा रिच डिजिटल मार्केटिंगला खुणावत आहे. इंटरनेट वापराच्या वाढत्या आकडेवारीवरून हा निष्कर्ष अधोरेखित झाला असून डिजिटल युगात प्रादेशिक मातृभाषांचा डंका जोरदार वाजतोय.

Regional Language Digital Content
Flying Kiss Case Verdict: मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्याला तीन वर्षांचा तुरुंगवास

2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सल्लागार संस्था (केपीएमजी) आणि गुगल यांच्या संयुक्त अहवालानुसार भारतातील सुमारे 90 टक्के नवे इंटरनेट वापरकर्ते स्थानिक भाषेतील मजकूर वाचण्यास आणि पाहण्यास प्राधान्य देतात. म्हणजेच इंटरनेट वापरणाऱ्या नव्या पिढीला आपलीच भाषा अधिक सोयीची वाटते. ग््राामीण आणि निमशहरी भागातून इंटरनेट वापर वाढत असल्याने प्रादेशिक भाषांची वाढ अधिक वेगाने होत आहे. यूट्यूब, फेसबुक, थेड, इन्स्टाग््राामसारख्या प्लॅटफॉर्मवर मराठीसह विविध भारतीय भाषांतील व्हिडीओ आणि पोस्ट मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत. अनेक ॲप्स आणि सरकारी सेवा आता मराठीत उपलब्ध आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना माहिती समजणे आणि सेवा वापरणे सोपे झाले आहे.

Regional Language Digital Content
Udaan Yatri Cafe Mumbai Airport: मुंबई, नागपूर विमानतळावर मिळणार स्वस्त नाश्ता

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि व्हॉईस सर्चमुळेही स्थानिक भाषांना चालना मिळाली आहे. अनेक जण मराठीत बोलून मोबाईलवर हवी असलेली माहिती शोधतात. भाषांतर आणि आवाजावर आधारित सुविधा उपलब्ध झाल्याने वापरणे सोपे झाले आहे.

Regional Language Digital Content
AI in Agriculture Maharashtra: एआयच्या साहाय्याने कृषी क्षेत्रात क्रांती शक्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल अर्थव्यवस्थेतही मातृभाषेचे महत्त्व

डिजिटल अर्थव्यवस्थेतही मातृभाषेचे महत्त्व वाढत आहे. ब्लॉगिंग, यूट्यूब, डिजिटल पत्रकारिता, डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन कोचिंग, वेबिनार आणि भाषांतर अशा क्षेत्रांत मराठी जाणकारांसाठी संधी निर्माण होत आहेत. स्थानिक भाषेत माहिती मिळाल्याने ग््रााहकांचा विश्वासही वाढतो, असे उद्योग क्षेत्रातील निरीक्षण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news