Udaan Yatri Cafe Mumbai Airport: मुंबई, नागपूर विमानतळावर मिळणार स्वस्त नाश्ता

दहा-वीस रुपयांत चहा, पाणी, समोसा; नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते उडाण यात्री कॅफेचे उद्घाटन
Udaan Yatri Cafe Mumbai Airport
Udaan Yatri Cafe Mumbai AirportPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबईसह नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता प्रवाशांना दहा ते वीस रुपयांमध्ये चहा, पाणी आणि समोसा मिळणार आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारापू नायडू यांनी शुक्रवारी या दोन्ही विमानतळांवर हे पदार्थ मिळणाऱ्या उडाण यात्री कॅफेचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन केले.

Udaan Yatri Cafe Mumbai Airport
Mumbai to Vijaydurg ferry service: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! यंदा शिमग्याला बोटीने गाठता येणार गाव; पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेट एक आणि दोनच्या दरम्यान हे कॅफे उघडण्यात आले असून, तेथे प्रवाशांना माफक दरात दर्जेदार नाश्ता उपलब्ध होणार आहे. 20 फेब्रुवारीपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या पदार्थांशिवाय कॉफी, नाश्त्यातील विविध खाद्यपदार्थही या कॅफेमध्ये मिळणार आहेत.

Udaan Yatri Cafe Mumbai Airport
Bhiwandi Mayor Election 2026: काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपचा बंडखोर नारायण चौधरी भिवंडीचा महापौर

सर्वसाधारणपणे विमानतळावर मिळणारे खाद्यपदार्थ अतिशय महाग दराने विकले जातात. साधा चहा घ्यायचा झाला तर त्यासाठी किमान दीडशे रुपये मोजावे लागतात. त्यामुळे अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभेत हा विषय उपस्थित केला होता. त्याची दखल घेत नागरी हवाई वाहतूक विभागाने माफक दरात नाश्ता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news