Flying Kiss Case Verdict: मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्याला तीन वर्षांचा तुरुंगवास

विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Flying Kiss Case Verdict
Flying Kiss Case VerdictPudhari
Published on
Updated on

मुंबई : 16 वर्षांच्या मुलीचा पाठलाग करुन तिला फ्लाईंग किस देणाऱ्या विकृताला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

फ्लाइंग किस देण्याची कृती लैंगिक हावभाव आहे. त्यामुळे पीडित मुलीचा लैंगिक छळ होतो. ते कृत्य पीडित मुलीच्या वा महिलेच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन करते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. याचवेळी आरोपीला 3 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. नऊ वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.

Flying Kiss Case Verdict
Mumbai Municipal Corporation: चार वर्षांनंतर मुंबई महापालिकेत राजकीय पर्व; स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे

31 जानेवारी 2017 रोजी हळदी कुंकू कार्यक्रमादरम्यान आरोपीने अल्पवयीन मुलीला पाहिले आणि तिच्याकडे पाहून तिला फ्लाईंग किस दिला. हे कृत्य पाहिलेल्या शेजाऱ्याने पीडितेच्या आईला आरोपीच्या आक्षेपार्ह हावभावाची माहिती दिली. त्यानंतर मुलीने तिच्याबाबतीत यापूर्वीदेखील अशीच घटना घडली असल्याचे सांगितले.

Flying Kiss Case Verdict
Maharashtra Budget Session: विरोधी पक्षनेत्यांविना अर्थसंकल्पीय अधिवेशन? निर्णय रखडल्याने राजकीय चर्चांना उधाण

मुलगी ट्यूशनला जात असताना आरोपी तिच्या मागून आला होता आणि त्याने तिचा हात धरुन स्वतःकडे खेचले होते. घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला तिच्या पालकांना हा प्रकार सांगितला नव्हता. मुलीला दिलेला फ्लाईंग किस तसेच तिचा पाठलाग आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. याच आरोपाखाली आरोपीला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Flying Kiss Case Verdict
Udaan Yatri Cafe Mumbai Airport: मुंबई, नागपूर विमानतळावर मिळणार स्वस्त नाश्ता

आरोपी विवाहित असून त्याला तीन महिन्यांचे बाळ आहे. खटल्यादरम्यान बचाव पक्षातर्फे वकील संतोष पगारे यांनी पीडित मुलीची उलटतपासणी केली. आधीच्या दुश्मनीतून खोटा आरोप लावण्यात आल्याचा बचावात्मक युक्तिवाद करण्यात आला होता. तथापि, न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य करीत आरोपीला शिक्षा सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news