CEC Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात राज-उद्धव एकत्र! ४ ऑक्टोबरला मुंबईत ठाकरे बंधूंचा महामोर्चा, काय आहे प्लॅन?

Raj Uddhav Thackeray Mumbai March: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा संयुक्त जनमोर्चा ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत होणार आहे.
Raj Uddhav Thackeray Mumbai March
Raj Uddhav Thackeray Mumbai MarchPudhari
Published on: 
Updated on: 

Raj Uddhav Thackeray Mumbai March: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली येत्या ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत जनमोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून ‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाविरोधात आवाज उठवला जाणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे या महामोर्चाची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना एकत्रितपणे मुंबईत जनमोर्चा काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा मोर्चा केवळ मनसे आणि शिवसेनेपुरता मर्यादित राहणार नाही. हा जनतेचा मोर्चा असेल. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी संवाद साधून त्यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे.

‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून राज्यातील जनतेने मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे. देशातील लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन ठाकरे बंधूंनी केले आहे.

Raj Uddhav Thackeray Mumbai March
CEC Gyanesh Kumar: 'महाभियोग आणता येणार नाही', ज्ञानेश कुमार प्रकरणात अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी असं का म्हणाले?

दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मोर्चाची वेळ आणि नेमके ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्याबाबतची माहिती लवकरच देण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Raj Uddhav Thackeray Mumbai March
Maharashtra Drought: महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर! फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

एकीकडे ‘कॉकरोच जनता पार्टी’कडून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली जात असताना आता ठाकरे बंधूंनीही ‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून थेट रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ४ ऑक्टोबरचा मुंबईतील मोर्चा चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news