Raj Thackeray: मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा... मनसे कार्यकर्त्यांना 'राज'मंत्र; उमेदवार याद्यांबाबत 'खास' रणनिती?

मनसेनं आपल्या उमेदवार याद्या अजून जाहीर केलेल्या नाहीत. यामागे एक खास रणनिती असल्याचं बोललं जात आहे.
Raj Thackeray
Raj Thackeraypudhari photo
Published on
Updated on

Raj Thackeray MNS Party Workers: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना निवडणुकीचा 'राज'मंत्र दिला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी त्यांना मुंबई ताब्यात घ्यायची आहे. मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा असं वक्तव्य केलं. याचबरोबर मनसेनं उमेदवार याद्या घोषित करण्याबाबत एक खास रणनिती आखली आहे.

Raj Thackeray
BMC Elections 2026: महायुतीला धक्का! अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मुंबईत एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय, नवाब मलिक...

मुंबई वाचवण्याची जबाबदारी तुमच्यावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अनेक कानमंत्र दिले. या मेळाव्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, मेळाव्यात राज ठाकरे यांनी निवडणुकीला एकजुटीने सामोरे जा. मुंबई वाचवण्याची जबाबदारी ही तुमच्यावर असल्याचं देखील राज ठाकरे यांनी सांगितलं.

Raj Thackeray
BMC Election 2026 : मुंबईत काँग्रेस-वंचितकडून आघाडीची घोषणा, जागा वाटपाचंही ठरलं!

पहिल्यांदाच युतीत लढतोय

बाळा नांदगावकर यांनी सांगितलं की, ही निवडणूक मराठी माणसाच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. त्यामुळं जोमानं निवडणुकीला सामोरे जा असा संदेश राज ठाकरे यांनी दिल्याचे सांगितले. त्यांनी, सीट शेअरिंगमध्ये काही सीट येतात काही जातात. काही लोकांना वाईट वाटतं ही गोष्ट खरी आहे.

गेल्या २० वर्षात आपण पहिल्यांदाच युतीमध्ये लढत आहोत. त्यामुळं युतीचा धर्म पाळायचा आहे. प्रत्येक जागा ही मुंबईसाठी महत्वाची आहे. महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे आणि मराठी माणसासाठी महत्वाची आहे.

बाळा नांदगावकरांनी ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे. रात्र वैऱ्याची आहे. सर्वस्व झोकून देऊन आपल्याला मुंबई वाचवायची आहे असा संदेश राज ठाकरे साहेबांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे सांगितले.

Raj Thackeray
Uddhav - Raj Thackeray Alliance : "लयास गेलेले अस्तित्व...." : ठाकरे बंधूंच्‍या युतीवर भाजप नेते बावनकुळेंची बोचरी टीका

AB फॉर्मबाबत देखील वक्तव्य

बाळा नांदगावकर यांनी मनसेनं अजून AB फॉर्म वाटले नसल्याबद्दल सांगितलं की, आजपासून AB फॉर्म वाटले जातील. आज साहेबांपुढे यादी जाईल त्यानंतर राजगड कार्यालयातून नितीन सरदेसाई शिरीश सावंत हे AB फॉर्मचं वाटप करणार आहेत अशी माहिती दिली.

मनसे किती जागा लढवणार आहे याबाबत मात्र नांदगावकरांनी गुप्तता पाळली. ते म्हणाले ज्यावेळी एबी फॉर्म येतील त्यावेळी आम्ही किती जागा लढवणार आहोत हे कळेल असं त्यांनी सांगितलं. मनसेनं शेवटपर्यंत किती जागा लढवणार अन् कोणाला उमेदवारी मिळणार हे गुलदस्त्यात ठेवण्याची रणनिती अवलंबली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news