Purandar IT Project: हिंजवडीवरील ताण कमी होणार, पुरंदरमध्ये आयटी पार्क; उद्योग मंत्री उदय सामंतांची घोषणा

५७२ हेक्टर जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया; कंपन्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी पाऊल
Uday Samant |
उद्योगमंत्री उदय सामंत Pudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे आयटी कंपन्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी पुरंदर येथे आयटी पार्क उभारण्याबाबत शासन सकारात्मक आहे. महसूल विभागाची प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून प्रकल्पाची कार्यवाही जलदगतीने केली जाईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

Uday Samant |
Metro Station Rickshaw: मेट्रो स्थानकांबाहेर आता रिक्षासेवा; प्रवाशांच्या प्रवासाला नवी सोय

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाढती वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे काही मोठ्या आयटी कंपन्या स्थलांतर होत असल्याची बाब विधानसभेत मांडण्यात आली. कंपन्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी पुरंदर तालुक्यातील दिवे, कोडीत आणि चांबळी परिसरातील गायरान जमीन आयटी पार्कसाठी हस्तांतरित करण्याबाबत शासनाची भूमिका काय, अशी लक्षवेधी सूचना विजय शिवतारे यांनी विधानसभेत मांडली.

Uday Samant |
High Court Tax Refund: करदात्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; जुना टॅक्स रिफंड नव्या मागणीविरुद्ध वळता करता येणार नाही

यावेळी झालेल्या चर्चेत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही सहभाग घेऊन सांगितले की, पुण्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार करता पुरंदर हा आयटी पार्कसाठी योग्य पर्याय आहे. 2025 मध्ये उद्योग विभागाच्या बैठकीत याबाबत प्राथमिक निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 15 ऑक्टोबर 2025 रोजी प्रस्ताव प्राप्त झाला असून 27 फेब्रुवारी 2026 रोजी उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी महसूल विभागाकडे 572 हेक्टर महसुली जमीन हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.

Uday Samant |
Asiatic Society Election: ‘एशियाटिक सोसायटी’ची निवडणूक ऐनवेळी स्थगित; धर्मादाय आयुक्तांकडून प्रशासक नियुक्त

ही जमीन शासनाची महसुली जमीन असल्याने ती उपलब्ध झाल्यास प्रकल्पासाठीचा खर्चही कमी होईल. यासाठी महसूल विभागाने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडणे आवश्यक आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया तातडीने, लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असेही राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news