Asiatic Society Election: ‘एशियाटिक सोसायटी’ची निवडणूक ऐनवेळी स्थगित; धर्मादाय आयुक्तांकडून प्रशासक नियुक्त

मतदारयादीतील गोंधळामुळे निर्णय; के. डी. तळोकार प्रशासक, नव्या मतदारयादीसाठी उपसमिती नियुक्त
Asiatic Society Election
Asiatic Society ElectionPudhari
Published on
Updated on

मुंबई : एशियाटिक सोसायटीच्या मतदारयाद्यांमधील गोंधळ संपत नसल्याने आज होणाऱ्या (14 मार्चला) निवडणुकीला ऐन 24 तास आधी धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी स्थगिती दिली असून, के. डी.तळोकार यांची एशियाटिक सोसायटीवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

नवीन कार्यकारिणी होईपर्यंत 2024-27 पर्यंत कार्यरत असलेल्या व्यवस्थापन समितीला प्रशासकांसोबत दैनंदिन कामकाज पाहण्याचे आदेश दिले आहेत. सोसायटीच्या मतदारांची अधिकृत यादी करण्यासाठी उपसमितीही नेमण्यात आली आहे.

Asiatic Society Election
Mumbai Hospital Canteen: गॅस टंचाईचा फटका रुग्णालयांनाही; मुंबईतील जे.जे., केईएम, नायरमध्ये उपाहारगृहांमध्ये अन्नटंचाई

2024-27 या कालावधीसाठी कार्यरत असलेली मंदार भराडे, विवेक गणपुले, कुमार केतकर, सुरेंद्र कुलकर्णी, प्रा. सुरज पंडीत यांची व्यवस्थापन समिती प्रशासकांच्या समवेत दैनंदिन कामकाज पाहू शकते, मात्र कुमार केतकर आणि विवेक गणपुले हे सोसायटीच्या मतदार यादीच्या पुनर्रचनेत सहभागी होऊ शकणार नाहीत, असेही आदेशात धर्मादाय आयुक्तांनी नमूद केले आहे. प्रशासकांच्या मदतीने मंदार भराडे, सुरेंद्र कुलकर्णी आणि प्रा. सुरज पंडित यांची उपसमिती मतदारांच्या यादीकरिता नियुक्त करण्यात आली आहे.

मार्च 2025 अखेर सोसायटीचे सुमारे 3 हजार 638 सभासद होते. मात्र निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने नव्याने सभासद केल्याचे लक्षात येताच शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विचारधारेच्या कार्यकर्त्यांनीही सभासद संख्येत भर घातली आणि हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे गेले होते.

Asiatic Society Election
SGNP Rehabilitation: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करा; हद्द निश्चितीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

8 नोव्हेंबर 2025 रोजीच्या निवडणुकीत जुने 3 हजार 638 आणि सभासद पडताळणी पूर्ण झालेल्या सुमारे 350 मिळून 3 हजार 988 सभासदांनाच मतदानाचा हक्क देण्यात आला होता, मात्र धर्मादाय उपायुक्तांनी 3 ऑक्टोबरपर्यंत 2025 पर्यंत सभासदत्व दिलेल्यांना मतदानाचा अधिकार दिल्याने केतकर गटाने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले. सभासदत्व नोंदणीसाठी आलेल्या अर्जांबाबत सोसायटीने त्यांच्या अधिकार क्षेत्रात निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु सोसायटीने हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे नेण्याची गरज नव्हती असे सांगत धर्मादाय उपायुक्तांनी मतदार अधिकाराबाबत दिलेला निर्णय रद्द करण्याचा आदेश देत सोसायटीच्या कारभारावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. ही चपराक बसल्यानंतर निवडणूक घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने ही निवडणूक 14 मार्चला जाहीर झाली होती. मात्र मतदारयादीत दिवंगत केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख, पांडुंरगशास्त्री आठवले, समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्यासारख्या अनेक दिवंगत नामवंताची नावे असल्याचे मतदानाच्या काही तास आधी आढळून आले. आजीव आणि निवासी सभासदांच्या नावाबद्दलही गोंधळ असल्याची दखल घेण्यात आली.

Asiatic Society Election
Wainganga River Linking: वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी ९५ हजार कोटी; विदर्भातील १० लाख एकर जमीन सिंचनाखाली

निवडणुकीची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने व पराभव निश्चित असल्याचे लक्षात आल्याने संघाच्या उमेदवारांनी मुख्यमंत्री कार्यालयाचा वापर करून कटकारस्थान करून निवडणुका पुढे ढकलल्या.हा आरएसएस आणि त्यांच्या टोळीचा नैतिक पराभव आहे.

धनंजय शिंदे, समन्वयक - कुमार केतकर गट

अगदी ऐनवेळी संध्याकाळी 5.30 वाजता धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाची प्रत मिळाली. या आदेशाचा कायदेशीर सल्लागारासमवेत अभ्यास करून पुढील निर्णय आम्ही घेऊ, सोसायटीचा कारभार नवनिर्वाचित कार्यकारिणीकडे लवकरात लवकर यावा, निवडणुका व्हाव्यात ही आमची भूमिका ठाम आहे.

विनय सहस्रबुद्धे, अध्यक्षपदाचे उमेदवार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news