High Court Tax Refund: करदात्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; जुना टॅक्स रिफंड नव्या मागणीविरुद्ध वळता करता येणार नाही

ॲम्नेस्टी योजनेअंतर्गत थकबाकीचा निपटारा केल्यास रिफंड अडवता येणार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई उच्च न्यायालय / Mumbai High court
मुंबई उच्च न्यायालय / Mumbai High court pudhari file photo
Published on
Updated on

मुंबई : जुन्या थकबाकीसाठी सेटलमेंट योजनेचा लाभ घेतलेल्या राज्यातील हजारो करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.जर एखाद्या करदात्याने ॲम्नेस्टी स्कीम अंतर्गत थकबाकीचा निपटारा करण्यासाठी अर्ज केला असेल, तर सरकार त्यांचा जुना टॅक्स रिफंड नवीन मागणीविरुद्ध परस्पर वळता करू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.

मुंबई उच्च न्यायालय / Mumbai High court
Asiatic Society Election: ‘एशियाटिक सोसायटी’ची निवडणूक ऐनवेळी स्थगित; धर्मादाय आयुक्तांकडून प्रशासक नियुक्त

प्रेसिडेंट ट्रेड अँड एक्झिम कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. कंपनीचा 2007-08 या वर्षाचा 33.29 लाख रुपयांचा रिफंड सरकारकडे प्रलंबित होता. याचदरम्यानच्या काळात सरकारने प्रलंबित कर विवादांसाठी महाराष्ट्र थकबाकी तडजोड योजना 2023 जाहीर केली. त्या योजनेंतर्गत याचिकाकर्त्या कंपनीने 2008-09 आणि 2009-10 या वर्षांतील थकबाकीचा निपटारा करण्यासाठी अर्ज केला

मुंबई उच्च न्यायालय / Mumbai High court
Mumbai Hospital Canteen: गॅस टंचाईचा फटका रुग्णालयांनाही; मुंबईतील जे.जे., केईएम, नायरमध्ये उपाहारगृहांमध्ये अन्नटंचाई

आणि नियमानुसार 20 टक्क्यांची रक्कम भरली. मात्र, विक्रीकर विभागाने कंपनीचा आर्थिक वर्ष 2007-08 चा रिफंड थेट 2008-09 च्या थकबाकीशी वळता केला आणि रिफंड देण्यास नकार दिला. यावर याचिकाकर्त्या कंपनीच्या वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यावर सरकारची बाजू ऐकून घेत न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. सेटलमेंट ॲक्ट हा एक स्वतंत्र कायदा आहे. एकदा करदात्याने या योजनेचा लाभ घेतला की, तो थकबाकीतून मुक्त होतो. रिफंडची रक्कम अशा प्रकारे

मुंबई उच्च न्यायालय / Mumbai High court
SGNP Rehabilitation: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करा; हद्द निश्चितीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

थकबाकीशी वळती करणे हे सेटलमेंट योजनेच्या उद्देशाला हरताळ फासणारे आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले आणि 18 एप्रिल 2024 रोजी कर विभागाचा आदेश रद्द केला. याचवेळी याचिकाकर्त्या कंपनीचा 33.29 लाख रुपयांचा रिफंड व्याजासह 2 आठवड्यांच्या आत कंपनीच्या खात्यात जमा करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news