Metro Station Rickshaw: मेट्रो स्थानकांबाहेर आता रिक्षासेवा; प्रवाशांच्या प्रवासाला नवी सोय

भुयारी मेट्रोसाठी फीडर सेवांचा विस्तार; बुकिंगसह किंवा थेट रिक्षा उपलब्ध
मेट्रो प्रकल्प / Metro project
मेट्रो प्रकल्प / Metro projectpudhari file photo
Published on
Updated on

मुंबई : भुयारी मेट्रोकडे जास्तीत जास्त प्रवाशांना वळवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मेट्रो स्थानकांबाहेर आता रिक्षा सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. आधीच बुकींग करून किंवा न करताही प्रवाशांना रिक्षा पकडता येईल.

मेट्रो प्रकल्प / Metro project
High Court Tax Refund: करदात्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; जुना टॅक्स रिफंड नव्या मागणीविरुद्ध वळता करता येणार नाही

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भुयारी मेट्रो स्थानकांबाहेर फीडर बससेवा सुरू करण्यात आली. वांद्रे-कुर्ला संकुल, वरळी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या प्रमुख स्थानकांबाहेर सिटीफ्लो या खासगी कंपनीच्या बस प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बीकेसी मेट्रो स्थानकावरून निघणारी बस एनएसई, जिओ गार्डन, वन बीकेसी आणि कौटुंबिक न्यायालय यांसारख्या प्रमुख ठिकाणांवरून जाते.

मेट्रो प्रकल्प / Metro project
Asiatic Society Election: ‘एशियाटिक सोसायटी’ची निवडणूक ऐनवेळी स्थगित; धर्मादाय आयुक्तांकडून प्रशासक नियुक्त

वरळी येथील बससेवा सेंच्युरी मिल्स, वन इंडिया बुल्स सेंटर, कमला मिल्स आणि पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क या ठिकाणी तर सीएसएमटी येथून जाणारी बस ओल्ड कस्टम हाऊस, लायन्स गेट, एस.पी. मुखर्जी चौक, के.सी. कॉलेज आणि चर्चगेट मेट्रो स्थानक येथे जाते. तसेच काही मेट्रो स्थानकांबाहेर उबेर या खासगी कंपनीची टॅक्सीसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news