

अलिबाग : दैनिक पुढारीचे पुढारपण हे जनसामान्यांचे आहे, त्यामुळे जनमानसाचा पाठिंबा महाराष्ट्रभर या दैनिकास मिळाला आहे. कोकणातील पुढारी हे अग्रगण्य दैनिक आहे. माझा पुढारीचा स्नेहभाव अनेक वर्षांपासूनचा आहे. आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी दैनिक पुढारी परिवारास शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
रायगडच्या मातीशी एक तप नाळ जुळलेल्या दै.पुढारीच्या रायगड आवृत्तीचा 12 वा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी ( 1 जानेवारी) अलिबाग येथे मोठ्याउत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत रायगडातील विविधक्षेत्रात वैशिष्ठ्यपूर्ण कामगिरी केलेल्या महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अलिबागचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या चेंढरे बायपासवरील पीएनपी नाट्यगृहात गुरुवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माजी आ.अनिकेत तटकरे, पीएनपी सांस्कृतिक मंडळाच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, आरसीएफ थळचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे, जेएसडब्ल्यू स्टील लि.चे वरिष्ठ जनसंपर्क प्रबंधक कुमार थत्ते आदी मान्यवर उपस्थित होते. .यावेळी दै.पुढारीतर्फे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नवदुर्गांचा मान्यवरांच्या उपस्थितीत नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी पुढे म्हणाले, जनसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देणारा असा पुढारी आहे आणि या कार्यक्रमासाठी मला पुढारीचा आग्रह मला टाळता आला नाही. रायगडचा जिल्हाधिकारी असताना अलिबागशी माझे एक वेगळं नातं निर्माण झाले आहे. मला जिल्हाधिकारी पद सोडून पाच वर्षे झाली परंतु अजूनही अलिबाग म्हटले की कुठल्या ना कुठल्या कारणाने जर संधी मिळाली तर मी कधीच सोडत नाही. इथे काम करत असताना खूप काही अनेक घटना घडल्या. या सर्व प्रवासामध्ये अनेक वेळा संघर्षाचे क्षण आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. अनेक वेळा आनंदाचे क्षण आले. या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे की येथील नेत्यांमध्ये प्रगल्भता पाहायला मिळाली. अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर रणगाडा आणण्यासाठी मी प्रयत्न केले. त्यानंतर इथे रणगाडा आणला गेला. मी रायगडमधून बदली होऊन गेलो. नऊ महिन्यानंतर या रणगड्याचे उद्घाटन करण्यात आले. आपण जिल्हाधिकारी पदावर नसतानाही शेकापचे नेते जयंत पाटील यांनी या रणगडाचे उद्घाटन आपणच करावे असा आग्रह धरला आणि त्या दै. पुढारीचे पुढारपण जनसामान्यांचे कोकण आयुक्त विजय सुर्यवंशी यांचे प्रतिपादन रणगाड्याचे उद्घाटन माझ्या हातून झाले म्हणून इथली आपली कारकीर्द आनंददायी आणि स्वस्मरणी अशी आहे.
विजय सूर्यवंशी पुढे म्हणाले की, माझ्या सुवर्ण पुस्तकातील सुंदर पान रायगडची माझी कारकीर्द आहे. दिल्लीतून रायगडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून येताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी असलेल्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी काम करण्याची संधी मिळत होती. रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून काम करताना अभिमान वाटायचा, असे त्यांनी सांगितले.
अलिबागमधील पीएनपी नाट्य गृहाबात सूर्यवंशी म्हणाले, येथील नाट्यगृहाच्या ही अनेक आठवणी आहेत. निवडणूक प्रशिक्षण अनेक वेळा यासाठी नाट्यगृहात होत असे. मात्र काही वर्षांपूर्वी या नाट्यगृहात अपघात घडला. नाट्यगृहाची नुकसान झाले मात्र जयंत पाटील यांनी फिनिक्स पक्ष्यासारखे या नाट्यगृहाच्या कामांमध्ये झेप घेत हे नाट्यगृह पुन्हा उभारले आहे. येथील सांस्कृतिक चळवळीचे हे मुख्य केंद्र असलेल्या पुन्हा उभे करण्यात यश आले आहे. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना विविध उपक्रम राबविले आहेत. आज दैनिक पुढारीतर्फे जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा नवदुर्गा म्हणून सन्मान करता केला जात आहे. म्हणूनच पुढारीचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे सांगून त्यांनी पुढारीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या युगात टीआरपीच्या मागे न धावता सामाजिक बांधिलकी जपत पुढारीने रायगडच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडली, असे प्रतिपादन माजी आम. अनिकेत तटकरे यांनी केले.आपल्या छोटेखानी भाषणातून त्यांनी दैनिक पुढारीच्या कार्याचा आढावा घेतला. ग. गो. जाधव यांनी ज्या ध्येयाने पुढारीची सुरुवात केली. तिचं परंपरा प्रतापसिंह जाधव यांनी जोपासत पुढारीचा राज्यव्यापी विस्तार केला. आज त्या परिवाराची तिसरी पिढी योगेश जाधव हे समर्थपणे पुढारीचा व्याप सांभाळत आहे. बदलत्या काळानुसार पुढारी चॅनेल, यु ट्यूब चॅनेल, ऑनलाईन सारख्या माध्यमातून पुढारीचा विस्तार केला आहे. दररोज 25 लाख प्रति प्रकाशित केल्या जातात. त्यातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम प्रामाणिकपणे केले जात आहे, असेही तटकरे यांनी आवर्जून नमूद केले.रायगड मध्ये पुढारीची सक्षम टीम उभी राहिल्याचेही अनिकेत तटकरे यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील चांगले कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याचे पुढारीचे कार्य समाजाभीमुख असल्याचे प्रतिपादन पीएनपी सांस्कृतिक मंडळाच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी केले. पुढारी असो वा कृषीवलं यासारख्या वृत्तपत्रानी नेहमीच समाजाशी बांधिलकी राखली आहे. यापुढेही असेच कार्य सुरू ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पीएनपी नाट्यगृह एका छोट्याश्या दुर्घटनेने डोळ्यासमोर भस्मसात झाले. त्यावेळी झालेल्या वेदना खूप खोलवर झाल्या. पण जयंत पाटील यांनी मोठ्या जिद्दीने नाट्यगृह उभारणारच असा निर्धार केला आणि चार वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर हे नाट्यगृह उभे करण्यात आले, याची आठवण चित्रलेखा पाटील यांनी यावेळी काढली.
वर्धापनदिन कार्यक्रमात पुढारीतर्फे विविधक्षेत्रात कार्यरतअसलेल्या नऊ महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये यशस्वी सामाजिक कार्यकर्ती सुजाता सुधीर कोळी, रायगड जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, संजना संदेश पाटील, ज्योत्स्ना महेश विरले, तनिषा वर्तक, सुचेता नंदकुमार खरोटे, भारती शेखर वडाळकर, इजाबेल जॉन्सन डिसोझा यांचा समावेश होता. याशिवाय दैनिक पुढारी परिवारातील महाडचे ज्येष्ठ प्रतिनिधी श्रीकृष्ण बाळ,रोह्याचे महादेव सरसंबे,अभय पाटील, अतुल गुळवणी, मनस्वी पाटील, आनंद सकपाळ, रघुनाथ भागवत आदींचाही सन्मानही करण्यात आला. पुढारी परिवारातर्फे निवासी संपादक शशिकांत सावंत, ब्युरो चीफ जयंत धुळप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.चंद्रशेखर साठ्ये यांनी केले.